पुणे :पुण्यातील हडपसर येथे राहणाऱ्या स्नेहल सातव या गेल्या सात वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत. आर्थिक अडचणी, पतीचं आजारपण आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च या सगळ्यामुळे स्नेहल यांनी रिक्षा हाती घेतली.या सात वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलं, पण हार मानली नाही. आज त्या आत्मविश्वासाने हडपसर भागात रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.स्नेहल सातव यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल लोकल 18 ला माहिती दिली आहे.