सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी अतिवृष्टीमुळे दुतळी भरून वाहत होती. सीना नदीतून 2लाख कुसेक्सपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने सोलापूर - विजयपूर महामार्गावरील दोन्ही बाजूला नदीचं पाणी आल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाण्याची पातळी कमी झाल्याने 48 तासानंतर सोलापूर विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.