आयपीएलच्या पहिल्या दिवसाच्या लिलावात एकूण ८४ खेळाडूंना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. त्यापैकी ७२ खेळाडूंना विकत घेतले गेले.. तर १२ खेळाडूंना कुणीही खरेदी केले नाही. ७२ खेळाडूंच्या यादीत भारताच्या रिषभ पंतने इतिहासातील सर्वाधिक बोली कमावत २७ कोटींसह विक्रम रचला. त्याला लखनौ सुपरजायंट्स संघाने खरेदी केले. त्याखालोखाल श्रेयस अय्यरला २६ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर पंजाब किंग्जने संघात घेतले.