आयपीएल टीम मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या मालकीन नीता अंबानी यांनी सोमवारी जेद्दाह येथे झालेल्या आयपीएल लिलावाला हजेरी लावली होती. लिलावानंतर नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आणि मुंबई इंडियन्सने खरेदी केलेल्या खेळाडूंवर भाष्य केलं. आम्ही तरुण खेळाडूंना संधी देत आहे, असं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. देशाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आम्हाला तयार करायचे आहेत, असंही नीता अंबानी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी मराठीमध्ये भावना व्यक्त केल्या.