
मुंबई: 22 वर्षांची प्रणाली व्हावाळ ही तरुणी फॅशन डिझाईनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करत होती. पण काही काळानंतर तिला जाणवलं की तिच्या हातातही आणि तिच्या आईच्या हातातही एक सुंदर कला आहे. फॅब्रिकपासून ज्वेलरी तयार करण्याची. अनेक वर्ष आईने या कलेवर घर सांभाळलं, आणि हीच कला स्वतःकडेही आहे हे लक्षात आल्यावर प्रणालीने मोठा निर्णय घेतला. नोकरी सोडून तिने स्वतःचा फॅब्रिक ज्वेलरी व्यवसाय सुरू केला.