वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून आता १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसह मकोका लावण्यात आला आहे. या संदर्भात आता परळी बंदची हाक देण्यात आली. वाल्मिक कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्यात येत असल्याचं कराड यांच्या सुनेनं म्हटलं. जातीयवादातून खोटे आरोप केले जात असल्याचं त्या म्हणाल्या. पुरावे असतील तर दाखवा असं त्या म्हणाल्या.