पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील आरे ते कफ परेडदरम्यान भुयारी मेट्रो 3 चा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी मेट्रो ३ प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. यावेळी मुंबई मेट्रो 3 च्या चर्चगेट मेट्रो स्टेशनमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान प्रवाशांची मेट्रो स्थनकात तुफान गर्दी केली होती.