अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला करण्यात आलाय, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हल्लेखोर सैफच्या घरात रात्रभर दबा धरुन बसला होता असं सांगण्यात येतंय..हल्लेखोराचा रात्री २ वाजता घरातील महिला कर्मचाऱ्याशी वाद झाला. हा आवाज ऐकून सैफ बाहेर आला. याचवेळी आरोपीने त्याच्याव चाकू हल्ला केला. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून आता मोठं वक्तव्य करण्यात आलं असून आरोपी नेमका आला कुठून, त्यांनी घरात प्रवेश कसा केला या बद्दल वक्तव्य केलं आहे. एक संशयित आरोपी निदर्शनास आला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं वक्तव्य पोलीस वरिष्ठांकडून करण्यात आले आहे.