बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरात हल्ला झाल्याचा घटना घडली आहे. या हल्ल्यात त्याच्यावर सहा जीवघेणे वार करण्यात आले होते. हा हल्ला कोणी केला? कोणत्या कारणांसाठी केला? असे प्रश्न उपस्थित होत असताना आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा चेहरा समोर आला आहे. जिन्यांवरून खाली उतरतानाचा हा फोटो दिसत आहे.