अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आला. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यानं सैफवर हा हल्ला केल्याची माहिती आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून कलाकार, राजकीय नेते जर सुरक्षित नाहीत तर सामान्य माणूस का सुरक्षित असेल असा सवाल उपस्थित होत आहे. संजय राऊत यांनी या हल्ल्या प्रकरणात भाष्य केलं, त्यांनी गृहखात्यावर टीका केली आहे.