अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आला. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यानं सैफवर हा हल्ला केल्याची माहिती आहे. चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर वार केला. या हल्ल्यात सैफच्या मानेला जखम झाली. सैफच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली. चोरट्यानं त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं. लिलावती रूग्णालयात ऑपरेशननंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलं. सैफ अली खानला लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांकडून आता या अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. इतकी सुरक्षा असतानाही सैफच्या घरात नेमका चोर शिरलाच कसा याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. यावर आता शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर हल्लाबोल केला आहे.