Saif Ali Khan News: अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आला. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यानं सैफवर हा हल्ला केल्याची माहिती आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भाष्य केलं. प्रायमरी तपासामध्ये चोर आधीच घरात होता असं त्यांनी सांगितलं, या हल्ल्यामागच्या हेतू अद्यापही गुलदस्त्यापासून पोलीस प्रशासन काम करत आहे आणि या एका घटनेमुळे पोलीस प्रशासनावर बोट ठेवू नये असं ते म्हणाले.