
वर्धा : मेकअप हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. यासाठी महिला या ब्युटी पार्लरमध्ये जातात. त्यामुळे अनेक महिला ब्युटी पार्लरच्या व्यवसायात येऊ इच्छित असतात. त्यासाठीच ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणकोणते स्किल्स महत्त्वाचे आहेत? तुम्ही कमीत कमी खर्चात घरीच ब्युटी पार्लर कसे सुरू करू शकता? या संदर्भात वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे माहिती दिली आहे.
Last Updated: November 08, 2025, 19:35 ISTमुंबई: अनेक महिलांना सकाळची फ्रेश सुरुवात करण्यासाठी किंवा रात्री उशिरापर्यंत जागे राहण्यासाठी गरम गरम कॉफी पिण्याची सवय असते. काहींना ते काम करत असताना, अभ्यास करताना किंवा काहीही करत असताना सतत कॉफी पिण्याची गरज भासू शकते. यासाठी नक्कीच कॉफी हे तुमच्यासाठी योग्य पेय असू शकते. पण तुम्ही तुमच्या मासिक पाळीदरम्यान कॉफीचे सेवन करत असाल तर कॅफीन प्यायल्याने तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होऊ शकतो? याचीच माहिती मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिलीय.
Last Updated: November 08, 2025, 20:05 ISTपुणे : आजकाल अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत. ऑफिसमधील कामाचा ताण, घरगुती समस्या, एकटेपणा यामुळे मानसिक तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकजण डिप्रेशन कमी करण्यासाठी औषधे घेत आहेत. मात्र, ही औषधे हृदयासाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे अनेकांना माहिती नाही. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
Last Updated: November 08, 2025, 19:01 ISTआंबिवली स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर पंचशील महिला बचत गटाच्या माध्यमातून पोळीभाजी केंद्र हे स्टॉल सुरू केले रोज दुपारी १२वाजता हे स्टॉल सुरू केलं जात. यात तुम्हाला अस्सल मराठी मेजवानी बघायला मिळेल. 6 महिलांनी सुरू केलेल्या ह्या पोळीभाजी केंद्राला मोहन्यामधील व आसपासच्या परिसराचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Last Updated: November 08, 2025, 18:03 ISTपिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरामध्ये झालेल्या एका विचित्र आणि गंभीर अपघाताने सर्वांना हादरवून सोडले आहे. बीआरटी बस स्टँडजवळ एका बाईकस्वाराचा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टँडच्या लोखंडी ग्रिलमध्ये आदळला आणि त्याचे डोकं ग्रिलमध्ये अडकले
Last Updated: November 08, 2025, 17:45 IST