
वर्धा : प्रत्येकाला आहारात एखादा पदार्थ अधिक आवडतो तर एखादा अजिबात आवडत नाही. कारल्याची भाजी आरोग्यदायी असली तरी त्याच्या कडवट चवीमुळे अनेकजण ती टाळतातच. पण आहारात कारल्याचा समावेश गरजेचा असतो. त्यासाठी एक भन्नाट रेसिपी आहे. कारल्याचे चिप्स करून खाल्ल्यास कडवटपणा टाळता येतो आणि ते एकदम टेस्टी लागतात. हीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितलीय.