या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत आम्ही 66 लोक गमावले आहेत, असे येरलिकाया यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. आरोग्यमंत्री केमाल मेमिसोग्लू यांनी सांगितले की, जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्वाधिक कर्ज असलेला देश कोणता? टॉप 10 मध्ये भारताचा समावेश आहे का?
या आगीच्या घटनेचे व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओंमध्ये दिसत आहे की लोक जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर आग लागलेली दिसत आहे. आगीच्या घटनेनंतर इमारतीभोवती काळसर धुराचे लोट दिसत होते.
advertisement
स्की रिसॉर्टला अशा वेळी आग लागली आहे जेव्हा तेथे सर्वाधिक गर्दी असते. तुर्कस्तानात जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील शालेय सुट्ट्या पडतात. या काळात इस्तंबूल आणि अंकारा येथून अनेक लोक बोलू पर्वतावर स्कीइंगसाठी येतात.
आपण कधी सुधारणार? नीरज चोप्राच्या पत्नीबद्दल Googleवर पाहा काय सर्च केले
आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये 234 लोक होते, असे राज्य-नियंत्रित अनादोलू एजन्सीने बोलूचे राज्यपाल अब्दुलअझीझ आयडिन यांच्या हवाल्याने सांगितले. आग लागल्याचे कळताच काहींनी घाबरून उड्या मारल्यामुळे या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला. तुर्कीच्या टीव्ही चॅनेल्सनी प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये हॉटेलच्या वरच्या मजल्यांवर आग भडकलेली दिसत होती. काही फुटेजमध्ये लोकांनी बेडशीट्स बांधून आगेतून पळण्याचा प्रयत्न करताना दिसले.
