सर्वाधिक कर्ज असलेला देश कोणता? टॉप 10 मध्ये भारताचा समावेश आहे का? तुम्हीच चेक करा!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Highest Debt Country: विकासासाठी जगभरातील अनेक देश कर्ज घेतात. पण काही देश असे देखील आहेत जे घेतलेले कर्ज परत करत नाही. त्यामुळे या देशांवरील कर्जाचे ओझे वाढते.
नवी दिल्ली: जेव्हा एखाद्या देशाच्या कर्जाचा विषय निघतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्या समोर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे नाव समोर येते. मात्र जगातील 10 सर्वात मोठ्या कर्जदार देशांच्या यादीत या दोन्ही देशांचा समावेश नाही. एखाद्या देशावर किती कर्ज आहे हे ते त्या देशाच्या GDPच्या हिशोबाने निश्चित केले जाते.
जगातील प्रत्येक देश विकासासाठी आणि प्रकल्पासाठी कर्ज घेतो. पण जगात असे ही देश आहेत जे कर्ज घेतात, पण ते परत करत नाहीत. त्यामुळे त्या देशांवर कर्जाचा भार वाढत जातो. GDPच्या प्रमाणात सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या देशांमध्ये कोण-कोण समाविष्ट आहे ते जाणून घेऊयात...
advertisement
जगातील सर्वात मोठे कर्जदार देशांची यादी (GDPच्या हिशोबाने)
सुदान
कर्जाचे एकूण प्रमाण: 102.6 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 344.4%
सूडान हा जगातील सर्वात मोठा कर्जदार देश आहे.
जपान
कर्जाचे एकूण प्रमाण: 10224.1 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 251%
जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
advertisement
सिंगापूर
कर्जाचे एकूण प्रमाण: 929.8 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 175%
ग्रीस
कर्जाचे एकूण प्रमाण: 401.8 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 159%
इटली
कर्जाचे एकूण प्रमाण: 3253.4 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 136.9%
मालदीव
कर्जाचे एकूण प्रमाण: 9.2 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 131.8%
भारताचा शेजारी मालदीव सहाव्या क्रमांकावर आहे.
advertisement
बहरीन
कर्जाचे एकूण प्रमाण: 60.6 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 126.7%
अमेरिका
कर्जाचे एकूण प्रमाण: 35293 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 121%
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही अमेरिका सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
भूतान
कर्जाचे एकूण प्रमाण: 3.6 अब्ज डॉलर
GDPच्या तुलनेत कर्ज: 113.8%
फ्रान्स
कर्जाचे एकूण प्रमाण: 3564.5 अब्ज डॉलर
advertisement
GDPच्या तुलनेत कर्ज: 112.3%
या यादीत भारताचा समावेश नाही मात्र मालदीव आणि भूतान यांसारखे भारताचे शेजारी देशांचा यात समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 7:40 PM IST
मराठी बातम्या/मनी/
सर्वाधिक कर्ज असलेला देश कोणता? टॉप 10 मध्ये भारताचा समावेश आहे का? तुम्हीच चेक करा!