TRENDING:

काही तासात अमेरिकेत मोठी खळबळ, राजधानीनंतर गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयाबाहेर गोळीबार; देशात हाय अलर्ट

Last Updated:

CIA Headquarters: अमेरिकेत 24 तासांच्या आत दोन मोठ्या गोळीबाराच्या घटनांनी खळबळ उडवली आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथील इस्रायली दूतावासाच्या कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर आता व्हर्जिनियामधील सीआयए मुख्यालयाबाहेरही सुरक्षा रक्षकांनी एका संशयितावर गोळीबार केल्याने अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लँगले: अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील लँगले येथील सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) च्या मुख्यालयाबाहेर सुरक्षा रक्षकांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला, अशी माहिती यूएस मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.
News18
News18
advertisement

या घटनेला सीआयएने Security Incident असे संबोधले आहे. ही घटना एजन्सीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हा गोळीबार प्राणघातक नव्हता.म्हणजे संशयित व्यक्ती या घटनेत ठार झाली नाही. सीआयएच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, सीआयए मुख्यालयाबाहेर एक सुरक्षा घटना घडली होती. ज्यावर सुरक्षा यंत्रणांनी प्रतिसाद दिला.

मात्र रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, संशयिताला गोळी लागली होती की नाही. हे सीआयएने स्पष्ट करण्यास नकार दिला आहे. यूएस इंटेलिजन्स एजन्सीने दावा केला आहे की, कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराबाहेर संबंधित व्यक्तीला पकडले.

advertisement

अमेरिका हादरली, वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या 2 अधिकाऱ्यांच्या हत्येने जगभरात खळबळ

या घटनेनंतर सीआयएने इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आणि कर्मचाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले. मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. कृपया 22 मे साठी पर्यायी मार्गांचा वापर करा," असे एजन्सीने 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले.

फेअरफॅक्स काउंटी पोलिसांनी सांगितले की, सकाळी 4 च्या सुमारास मॅक्लीनमधील 900 डोली मॅडिसन बुलेव्हार्ड येथे सीआयए पोलिसांना वाहतूक नियंत्रणात मदत करण्यासाठी अधिकारी पाठवण्यात आले होते. पोलिसांनी गुरुवारी याची पुष्टी केली की त्यांचे अधिकारी अजूनही परिसरात वाहतूक व्यवस्थापनात मदत करत आहेत.

advertisement

वॉशिंग्टन येथील घटनेशी संबंध नाही

ही घटना वॉशिंग्टन डी.सी. येथील कॅपिटल ज्यूईश म्युझियमबाहेर इस्रायली दूतावासाचे दोन कर्मचारी यारॉन लिशिन्स्की आणि सारा मिलग्रिम यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या काही तासांनंतर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही घटनांमध्ये कोणताही संबंध असल्याचे पुरावे नाहीत.

वॉशिंग्टनमधील घटनेनंतर 30 वर्षीय संशयित एलियास रॉड्रिगेझला अटक करण्यात आली. ज्याने 'फ्री, फ्री पॅलेस्टाईन' च्या घोषणा दिल्या होत्या. तो शिकागोचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. डी.सी. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून एफबीआयच्या वॉशिंग्टन फील्ड ऑफिससमोरील या गोळीबाराची चौकशी करत आहेत. इस्रायली दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जगभरातील इस्रायली मिशनमध्ये अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याचे आवाहन केले आहे.

मराठी बातम्या/विदेश/
काही तासात अमेरिकेत मोठी खळबळ, राजधानीनंतर गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयाबाहेर गोळीबार; देशात हाय अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल