TRENDING:

जगभरात खलिस्तानी दहशतवाद्यांनी कसे पसरले हात-पाय? सिनेमा-गाण्यांचा घेतला आधार?

Last Updated:

काय आहे खलिस्तानी दहशतवाद्यांचा मेगाप्लान?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : कॅनडा हा खलिस्तानी चळवळीचा मोठा गड बनला आहे. तिथे बसून दहशतवादी भारताच्या विरोधात कट रचत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं सरकार खलिस्तानी समर्थकांच्या बाजूने आणि भारत सरकारच्या विरुद्ध असल्याचं दिसत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप खुद्द पंतप्रधानांनी केला आहे. भारताने तो आरोप फेटाळून लावला असला, तरीही त्यांच्या त्या आरोपानंतर दोन्ही देशांतल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
News18
News18
advertisement

भारत आणि कॅनडातल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांवर जागतिक राजकारणात चर्चा होत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने असा दावा केला आहे, की कॅनडातल्या काही भागांत भारताच्या विरुद्ध फुटीरतावादी आंदोलन तीव्र झालं आहे. जगभरातल्या तपास यंत्रणा खलिस्तानी आंदोलनांचा तपास करत आहेत.

एनआयएचा ताजा रिपोर्ट धक्कादायक आहे. खलिस्तानी गँगस्टर आणि दहशतवादी चित्रपट आणि मोठ्या स्पोर्ट्स लीगमध्ये गुंतवणूक करत आहेत. देशातल्या मोठ्या फुटबॉल लीगमध्येही गुंतवणूक करत आहेत. कॅनडा प्रीमिअर लीगमध्ये गुंतवणूक करून खलिस्तानी आपला अजेंडा सर्वत्र पसरवत आहेत. आपला अजेंडा पसरवण्याच्या बाबतीत खलिस्तानी आक्रमक आहेत.

advertisement

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानी कनेक्शन उघड

एनआयएने आपल्या आरोपपत्रात सांगितलं होतं, की खलिस्तानी कट्टरतावादी वसुली रॅकेट चालवत असून, फिल्म्स, तसंच कॅनडा प्रीमिअर लीगमध्ये पैसे गुंतवत आहेत. तसंच आपल्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी परदेशातून पैसे उभे करत आहेत.

हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2021 या कालावधीत पाच लाख ते 60 लाख रुपयांपर्यंतची 13 ट्रान्झॅक्शन्स केली गेली होती. हे सारं हवालाच्या माध्यमातून होत होतं. त्यांचा संदर्भ गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईपर्यंत पोहोचलेला होता.

advertisement

त्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता, की खलिस्तानी समर्थक दहशतवादी थायलंडमध्ये बार आणि नाइट क्लब्जना भारतातून पैसा पाठवत होते. जबरदस्तीने वसुली आणि अवैध मद्याच्या विक्रीतून खलिस्तानी पैसे गोळा करत होते. कॅनडात गँगस्टर गोल्डी बराड आणि सतबीरसिंग ऊर्फ सॅम यालाही पैसे पाठवले जात होते.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की एनआयएने बेकायदा धंद्यांवर रिपोर्ट तयार केला आहे. थायलंडमधूनही अवैध ट्रान्झॅक्शन करण्यात आलं आहे. जबरदस्तीने वसुली, अवैध मद्य, हत्यारांची तस्करी या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई पैसे गोळा करत होता आणि ते गँगस्टर वीरेंद्र प्रताप हवालाच्या माध्यमातून थायलंडमध्ये मनीष भंडारीपर्यंत पोहोचवत होता. त्याचं एक नाव काला राणा असंही आहे. त्याचे वडील जोगिंदरसिंग आणि राजकुमार ऊर्फ राजू बासोदी नाइट क्लब आणि बारमध्ये हे पैसे गुंतवत होते.

advertisement

एनआयएच्या रिपोर्टमध्ये ही बाब उघड झाली होती, की लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा जवळचा सहकारी गोल्डी बराड हे दोघं कॅनडात खलिस्तानी गटांसोबत काम करत आहेत. ती गँग भारतातून अवैध मार्गाने कॅनडात पैसे पाठवते. जस्टिन ट्रुडो यांनी आरोप केला होता, की कॅनडाचा नागरिक असलेल्या आणि खलिस्तानी टायगर फोर्स या फुटीरतावादी संघटनेचा प्रमुख असलेल्या हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात होता. त्यानंतर ट्रुडो यांचा भारतविरोधी चेहरा समोर आला आणि भारतीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
जगभरात खलिस्तानी दहशतवाद्यांनी कसे पसरले हात-पाय? सिनेमा-गाण्यांचा घेतला आधार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल