खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानी कनेक्शन उघड

Last Updated:

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर संदर्भात एक मोठा खुलासा समोर आला आहे.

News18
News18
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर :  भारत सोडून कॅनडात गेलेल्या आणि तिथं मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर संदर्भात एक मोठा खुलासा समोर आला आहे. त्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. गुप्तचर अहवालानुसा  निज्जर 2014-15 मध्ये पाकिस्तानला गेला होता. तिथं त्याने पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हत्येत वाँटेड असलेल्या दहशतवाद्याची भेट घेतली. तेव्हापासून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस.आय.साठी हरदीप भारतविरोधी कारवायांसाठी त्यांची मालमत्ता होता.
पाकिस्तानात निज्जरने खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) दहशतवादी जगतार सिंग तारा याची भेट घेतली, जो पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत यांच्या हत्येप्रकरणी वाँटेड होता. तेव्हापासून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस.आय.शी संबंध होता. गुप्तचर अहवालानुसार, 2015 मध्ये आयएसआयने ब्रिटिश कोलंबियाच्या मिसिगेन हिल्समध्ये खलिस्तान-समर्थित शीख कट्टरपंथीयांना प्रशिक्षण देण्यात मदत केली तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला.
advertisement
निज्जरचे बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी जगतार सिंग याच्याशीही संबंध होते. इतकंच नाही तर 1981 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे अपहरण करणाऱ्या टीमशी आणि खालसा नेता गजेंद्र सिंग यांच्याशीही तो संबंधित होता. 2018 मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी सादर केली होती, ज्यामध्ये हरदीप सिंह निज्जरचं नाव होतं.
advertisement
बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळून गेला
10 नोव्हेंबर 1977 रोजी जन्मलेला निज्जर खलिस्तान टायगर या कट्टर फुटीरतावादी गटाशी संबंधित होता, मात्र आणीबाणीच्या काळात निज्जरच्या भावाला 90 च्या दशकाच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती आणि हरदीप सिंगलाही 1995 मध्ये अटक करण्यात आली होती. याच आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर, 19 फेब्रुवारी 1997 रोजी तो रवी शर्माच्या नावाच्या बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाला, परंतु कॅनडातील टोरंटो विमानतळावर अधिकाऱ्यांनी त्याला पकडले.
advertisement
गुप्तचर अहवालानुसार, निज्जरने भारतात पोलिसांच्या क्रूरतेचा खोटा आरोप करून कॅनडाकडे आश्रय मागितला, पण तोही नाकारण्यात आला. नंतर त्याने एका ब्रिटीश कोलंबियन महिलेशी लग्न केले आणि तिला इमिग्रेशनसाठी प्रायोजित केले, परंतु कॅनेडियन अधिकार्‍यांनी ते इमिग्रेशन नाकारले कारण त्यांना संशय होता की हे लग्न लबाडी आहे आणि ते इमिग्रेशन मिळविण्यासाठी केले गेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे निज्जर यांना नंतर कॅनडाचे नागरिकत्व देण्यात आले.
मराठी बातम्या/विदेश/
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानी कनेक्शन उघड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement