TRENDING:

झेलेन्स्की म्हणाले होते 'पुतिन मरतील', मग रशियन राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात स्फोट झाला, क्रेमलिनमध्ये खळबळ!

Last Updated:

Moscow Blast : मॉस्कोमध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या अधिकृत कार ताफ्यातील ऑरुस सेनाट लिमोझीनला आग लागली. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मॉस्को: रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अधिकृत कार ताफ्यातील एका महागड्या लिमोझीनला मॉस्कोमधील FSB गुप्त सेवा मुख्यालयाच्या जवळ अचानक आग लागली. या घटनेचा व्हिडिओ फुटेज समोर आला आहे. त्यात ऑरुस सेनाट नावाची ही आलिशान कार संपूर्णपणे आगीच्या भडक्यात सापडल्याचे स्पष्ट दिसत आहे. या कारची किंमत जवळपास 3,55,796 (३ कोटींहून अधिक रुपये) असल्याचे सांगितले जात आहे. ही कार पुतिन यांच्या अधिकृत ताफ्यात समाविष्ट होती, अशी माहिती काही अहवालांमध्ये देण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

घटनेमुळे निर्माण झालेले प्रश्नचिन्ह

ही कार जळून खाक कशी झाली याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही. डेली एक्सप्रेसच्या अहवालानुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सोशल मीडियावर काही लोकांनी दावा केला आहे की ही कार व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील नव्हती. अद्याप स्पष्टता नसली तरी या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

advertisement

पुतिन यांच्यावर हल्ल्याच्या शक्यता?

या घटनेच्या काही दिवसांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पुतिन लवकरच मरण पावतील, असे भाकीत केले होते. यामुळे हा प्रकार हल्ला होता का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक रशियन सैन्य अधिकाऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने क्रेमलिनमधील अस्थिरता वाढली आहे. डिसेंबर महिन्यात लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव हे मॉस्कोतील एका स्फोटात मृत्युमुखी पडले होते. त्यांच्यावर युक्रेनमध्ये रासायनिक युद्धाच्या देखरेखीचा आरोप होता.

advertisement

क्रेमलिनमध्ये वाढती अस्वस्थता

ही घटना घडण्यापूर्वीच क्रेमलिनने पुतिन यांच्यावर कोणताही हल्ला झाल्यास रशिया कठोर पाऊल उचलणार असल्याचे जाहीर केले होते. रशियन संसदेचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोडिन यांनीही अशा हालचालींना जागतिक सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे सांगितले होते. रशियन गुप्तचर संस्थेचे प्रमुख किरिलो बुदानोव यांनीही पुतिन यांच्या जीवाला सातत्याने धोका असल्याचा दावा केला होता.

advertisement

पुतिन आणि ऑरुस गाड्यांचे खास नाते

राष्ट्राध्यक्ष पुतिन हे प्रामुख्याने रशियामध्ये तयार झालेल्या ऑरुस ब्रँडच्या गाड्यांचा वापर करतात. त्यांनी या गाड्या उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग-उन यांच्यासह काही महत्त्वाच्या परदेशी नेत्यांना भेट म्हणून दिल्या आहेत. मात्र या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

आग अपघात की कटकारस्थान?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

आग लागण्यामागे अपघात होता की हा कुठल्या मोठ्या कटाचा भाग आहे, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे. मॉस्कोतील सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र या घटनेमुळे क्रेमलिनमधील अंतर्गत आणि बाह्य धोके अधिकच अधोरेखित झाले आहेत.

मराठी बातम्या/विदेश/
झेलेन्स्की म्हणाले होते 'पुतिन मरतील', मग रशियन राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात स्फोट झाला, क्रेमलिनमध्ये खळबळ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल