भारताविरुद्ध विजय?
सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार भारताविरुद्धच्या ऑपरेशनमधील त्यांच्या रणनीतिक नेतृत्वासाठी आणि शत्रूवर निर्णायक विजय मिळवल्याबद्दल जनरल आसिम मुनीर यांना बढती देण्यात आली आहे. या बढतीमुळे जनरल मुनीर हे पाकिस्तानच्या लष्करी इतिहासातील 'फील्ड मार्शल' पद भूषवणारे दुर्मिळ अधिकारी ठरले आहेत.
एअर चीफ मार्शल सिद्धू यांनाही मुदतवाढ
याच बैठकीत मंत्रिमंडळाने एअर चीफ मार्शल झहीर बाबर सिद्धू यांनाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या हवाई दलात त्यांचा अनुभव आणि नेतृत्व आणखी काही काळ उपलब्ध राहणार आहे. या बढत्या आणि मुदतवाढ या पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वात मोठे बदल दर्शवतात आणि आगामी काळात त्याचा देशाच्या संरक्षण धोरणावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 20, 2025 6:19 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
विनाश काले विपरीत बुद्धि, PM शरीफ यांनी स्वत:चा घात केला; लष्करप्रमुख मुनीरला Promotion दिले
