मंगळवारी नऊ डब्यांमधून सुमारे 400 प्रवाशांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेस दुपारी क्वेटाहून पेशावरला जात असताना गुडालर आणि पिरू कुन्री या डोंगराळ भागांजवळील बोगद्यात सशस्त्र हल्लेखोरांनी तिला अडवलं. नंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी पाकिस्तानी टीव्ही चॅनेल दुनिया न्यूजला सांगितलं की, लष्कराने सर्व ३३ बलुच बंडखोरांना ठार मारलं आहे. आता तिथे एकही बलुच बंडखोर उपस्थित नाही. लष्कराकडून शोध मोहीम राबवली जात आहे. यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला याची माहिती नंतर जाहीर केली जाईल.
advertisement
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत २१ प्रवासी आणि ४ निमलष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करून आणि सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवून सशस्त्र दलांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली. मंगळवारी दहशतवाद्यांनी ट्रेनवर हल्ला केला तेव्हा २१ प्रवासी ठार झाल्याचं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. या घटनेत निमलष्करी दल फ्रंटियर कॉर्प्सचे चार जवानही शहीद झाल्याचे त्यांनी सांगितलं. सैन्याने सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार मारलं आणि अपहरणकर्त्यांची सुटका केली. नऊ डब्यांच्या जाफर एक्सप्रेसमध्ये सुमारे ४०० प्रवासी होते आणि ही ट्रेन क्वेट्टाहून पेशावरला जात होती. दरम्यान, क्वेट्टापासून १६० किमी अंतरावर असलेल्या गुडालर आणि पिरू कुनरी या डोंगराळ भागात एका बोगद्याजवळ दहशतवाद्यांनी स्फोटकांचा वापर करून ट्रेनचे अपहरण केले.
