पाकिस्तानी लष्करावर गंभीर आरोप
पश्तून तहफ्फुज मुव्हमेंट (PTM) चे कार्यकर्ते फजल उर रहमान अफ्रिदी यांनी या ड्रोन हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अफ्रिदी यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानी सैन्य पश्तून भागांचा वापर शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी 'प्रयोगशाळा' म्हणून करत आहे. गेल्या काही वर्षांत उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तान तसेच टँक जिल्ह्यामध्ये 32 हून अधिक ड्रोन हल्ले झाले आहेत.
advertisement
पाकिस्तानविरुद्ध आता 'इस्रायल मॉडेल', मुस्लिम देशांनी घेतला मोठा निर्णय
अफ्रिदी यांनी पाकिस्तानी लष्करावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानी लष्कराने 55,000 हून अधिक तालिबानी नेते आणि त्यांच्या कुटुंबांना पश्तून भागांमध्ये वसवले आहे आणि आता त्यांनाच दहशतवादी ठरवून हल्ल्यांसाठी निमित्त म्हणून वापरले जात आहे. या हल्ल्यांमागे पश्तून भागांच्या नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवण्याचा खरा उद्देश असल्याचा त्यांचा दावा आहे.
'ऑपरेशन सिंदूर'ला अफ्रिदी यांचा पाठिंबा
फजल उर रहमान अफ्रिदी यांनी भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन केले आहे. दहशतवादाविरोधात उचललेले हे योग्य पाऊल असल्याचे ते म्हणाले. या ऑपरेशननंतर पाकिस्तानी लष्कराने पश्तून नागरिकांवरील हल्ले तीव्र केले असून, त्यात निष्पाप बालके आणि वृद्धांना जीव गमवावा लागला असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर हे विधान आले आहे.
काय आहे 'ऑपरेशन सिंदूर'?
22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर भयंकर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांना ठार केले होते. मृतांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटकांचा समावेश होता. या हृदयद्रावक घटनेनंतर भारतीय लष्कराने 7 मे रोजी दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यात मसूद अझहरच्या लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हाफिज सईदच्या जमात-उद-दावाच्या दहशतवादी छावण्यांचाही समावेश होता.
