त्सुनामीचा अलर्ट
यूएस त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने टोंगा, फिजी आणि समोआ या बेटांसाठी संभाव्य त्सुनामीचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे.
म्यानमार भूकंप; 1300KM दूर बँकॉकमध्ये हाहाकार, 300KM लांब भारत कसा वाचला?
टोंगा: भूकंप व ज्वालामुखींसाठी संवेदनशील प्रदेश
advertisement
टोंगा हा 170 पेक्षा अधिक बेटांचा समूह आहे आणि भूकंप तसेच ज्वालामुखीच्या हालचालींसाठी संवेदनशील मानला जातो. 2022 मध्ये येथे हंगा टोंगा-हंगा हापाई ज्वालामुखीचा स्फोट झाला होता, ज्यामुळे प्रचंड हानी झाली होती.
भारतावर परिणाम होणार का?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, भारताच्या किनारपट्टीसाठी या भूकंपामुळे कोणताही धोका नाही.
म्यानमारमध्ये भूकंपामुळे मोठी हानी
टोंगातील भूकंपाच्या दोन दिवस आधी म्यानमारमध्ये एका विनाशकारी भूकंपाने 1,700 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मांडले शहरात मृतदेहांमुळे दुर्गंधी पसरली असून, लोक स्वतःच्या हातांनी मलबा हटवून आपले नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने म्यानमारसाठी 'ऑपरेशन ब्रह्मा' हाती घेतले आहे आणि मदतकार्य सुरू आहे.
