एमओपी हा साधारण ३० हजार पौंड वजनाचा बॉम्ब आहे. जो विशेषतः अंडरग्राऊंड टार्गेट नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा बॉम्ब अतिशय मजबूत स्टील मिश्रधातूपासून बनलेला असतो. ज्यामुळे जमीनीच्या शेकडो फूट आतमध्ये घुसण्याची या बॉम्बची क्षमता असते. हा बॉम्ब जमीनीत गेल्यानंतर स्फोट होतो. ज्यामुळे भूमिगत टार्गेटला भेदता येतं.
advertisement
बंकर बस्टर बॉम्ब जीपीएस नियंत्रित असतात
अमेरिकन हवाई दलाच्या मते, हा बॉम्ब जीपीएस मार्गदर्शित असतो. या बॉम्बला केवळ बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरनेच टाकता येतं. बी२ बॉम्बर रडारपासून लपून लांब अंतरावरून उड्डाण करू शकते. हवेत इंधन भरून हे बॉम्बर टार्गेटपर्यंत पोहोचू शकते.
बंकर बस्टर जमीनीत २०० फूट खोलीपर्यंत जाऊ शकतं
आतापर्यंत कोणत्याही युद्धात या बॉम्बच्या वापराबद्दल कोणतीही अधिकृत माहिती सार्वजनिक केलेली नाही. परंतु लष्करी तज्ज्ञांचा मते, हा बॉम्ब आता पूर्वीपेक्षा अधिक प्रगत आणि प्रभावी झाला आहे. हा बॉम्ब सुमारे २०० फूट खोलीपर्यंत आत घुसू शकतो. गेल्या २० वर्षांत या बॉम्बमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे याची क्षमता आणखी वाढली आहे.
बंकर बस्टर बी२ बॉम्बर्समधूनच सोडता येते
सध्या अमेरिकन हवाई दलाकडे १९ अॅक्टीव्ह बी२ बॉम्बर्स आहेत. ते सबसोनिक वेगाने उड्डाण करतात. मात्र याची रेंज बरीच मोठी आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, २०१७ मध्ये अमेरिकेच्या दोन बी२ बॉम्बर्सने ३४ तास उड्डाण करत लिबियातील इस्लामिक स्टेटच्या कॅम्पवर हल्ला केला होता. इस्रायलने गाझा, लेबनॉन आणि आता इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अमेरिकन बॉम्बचा वापर केला असला तरी, त्यांची लढाऊ विमाने इतके जड बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम नाहीत. यामुळेच इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ट्रम्प यांना इराणविरुद्धच्या युद्धात सामील होण्याची मागणी करत होते.
