आतापर्यंत तुम्ही सर्वात विषारी म्हणून सापांचं नाव ऐकलं असेल, जे कोणालाही मारू शकतात. त्यांचं विष देखील खूप महाग विकलं जातं आणि ते काढणं सोपं नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला सापापेक्षा खूपच लहान असलेल्या एका जीवाबद्दल सांगणार आहोत, ज्याचं विष एखाद्याला करोडपती बनवू शकतं. ज्या विषातून एखाद्या व्यक्तीला वाचवता येऊ शकतं, ते विष जर तुम्हाला मिळवता आलं, तर समजा तुम्हाला करोडोंची लॉटरी लागली आहे. पण यासाठी एक खासप्रकारचा विंचू हवा. इतकी किंमत सामान्य नाही तर निळ्या रंगाच्या विंचवाच्या विषासाठी मिळते.
advertisement
Weird Animal : अमरत्वाचं वरदान घेऊन जन्माला आलेला हा जीव; याचा कधीच होत नाही मृत्यून
आपण ज्या जीवाबद्दल बोलत आहोत तो आफ्रिका किंवा अॅमेझॉनच्या जंगलात आढळत नाही. तर, तो तुमच्या घराच्या आसपास आढळतो. वेळेवर उपचार न केल्यास अनेक वेळा त्याचा डंक जीवघेणा ठरतो. हा धोकादायक जीव म्हणजेच विंचू, ज्याच्या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 10 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. विंचवाचे एक लिटर विष 10,302,700 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 85 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकले जाते.
एका विंचवापासून सुमारे 2 मिली विष काढलं जातं. त्यामुळे, जर तुम्हाला एका विंचवाचंही विष मिळालं, तरी तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकता. विंचवाच्या विषाचा उपयोग काय असतो आणि ते एवढं महाग का विकत घेतलं जातं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचा उपयोग अँटी-वेनम बनवण्याव्यतिरिक्त, ऑस्टियोआर्थराइटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि मायस्थेनिया ग्रॅव्हिसच्या उपचारांमध्ये याचा वापर केला जातो. प्रयोगशाळेत त्याचं पावडर स्वरूपात रूपांतर केल्यानंतर त्याची विक्री केली जाते.