उत्तर प्रदेशतील ही घटना आहे. इथल्या लक्ष्मणपूर गावातील रहिवासी अनुप यादव आणि पप्पू कोरी हे अहमदाबादमध्ये काम करायचे. दोघंही एकत्र राहत होते आणि या काळात त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. पण ही मैत्री कधी बायकांच्या अदलाबदलीत बदलेल याची कल्पना कोणी केली नव्हती. अनुपच्या पत्नीने आरोप केला आहे की तिच्या पतीने तिला जबरदस्तीने त्याचा मित्र पप्पूसोबत राहण्यास सांगितले. दुसरीकडे, पप्पूने आरोप केला आहे की अनुप त्याच्या पत्नीला सोबत घेऊन गेला.
advertisement
नवरा हवा आणि बॉयफ्रेंडही! महिलेने दिली अशी ऑफर, सगळे चक्रावले, पतीने तर हातच जोडले
अनुपच्या पत्नीने आरोप केला आहे की तिच्या पतीने तिला जबरदस्तीने त्याचा मित्र पप्पूसोबत राहण्यास सांगितलं. अनुपच्या पत्नीचं म्हणणं आहे की लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिचा पती तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून गेला आणि परत आल्यावर पप्पूसोबत राहण्यासाठी दबाव आणला. दुसरीकडे पप्पूने आरोप केला आहे की अनुप त्याच्या पत्नीला सोबत घेऊन गेला. अनुप त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या पत्नीशी जवळीक वाढवत होता आणि तिला त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडत होता. या प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक पैलू तेव्हा उघडकीस आला जेव्हा पप्पूच्या पत्नीने तडजोडीसाठी 5 लाख रुपये आणि एक नवीन बाईक मागितली.
Google : मुलाने गुगलला विचारला मुलींबाबत असा प्रश्न, 7 दिवस झाले उत्तरच संपेना
जिथं एकेकाळी नातं विश्वास आणि प्रेमावर आधारित होतं, ते आता व्यवहार आणि दबावात बदलताना दिसतं.
पाश्चात्य देशांमध्ये याला वाइफ स्वॅपिंग म्हणतात. तिथं काही जोडपी परस्पर संमतीने जोडीदारांची अदलाबदल करतात. ही प्रथा अजूनही वादविवाद आणि टीकेचा विषय आहे. भारतीय समाजात जिथे लग्नाला सात जीवांचे बंधन मानले जाते, तिथे अशी प्रथा सामाजिक नियमांचे उल्लंघन करण्यासारखी आहे.