नवरा हवा आणि बॉयफ्रेंडही! महिलेने दिली अशी ऑफर, सगळे चक्रावले, पतीने तर हातच जोडले

Last Updated:

Extra Marital Affair : महिलेला विचारण्यात आलं की तिला कोणासोबत राहायचं आहे? तिने सांगितलं की तिला दोघांसोबत राहायचं आहे. तिला नवराही हवा होता आणि बॉयफ्रेंडही. आता हे कसं शक्य आहे? तर यासाठी तिने ऑफर दिली.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
लखनऊ : लग्नानंतर दुसऱ्या कुणाशीतरी संबंध आता काही नवीन राहिलं नाही. कितीतरी लोक असे आहेत. काहीजण गुपचूप अफेअर करतात, तर काहींची अशी लफडी बाहेर येतात. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. एक विवाहित महिला जिचे विवाहबाह्य संबंध होते. पण तिचं तिचा नवरा आणि बॉयफ्रेंड दोघांवरही सारखं प्रेम. तिला दोघंही हवे होते. दोघांपैकी एकालाही ती सोडायला तयार नव्हती. यासाठी तिने अशी ऑफर दिली की सगळे थक्क झाले.
उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील ही घटना आहे. महिलेचं लग्न तिच्या शेजारीच राहणाऱ्या तरुणाशी झालं होतं. तरी तिचा दुसऱ्या पुरुषावर जीव जडला. परपुरुषासोबत तिचे प्रेमसंबंध होते. ती त्याच्यासोबत पळूनही गेली होती. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 10 वेळा ती पळाली. शेवटी याबाबत पंचायत बोलावण्यात आली.
advertisement
महिलेला विचारण्यात आलं की तिला कोणासोबत राहायचं आहे? तिने सांगितलं की तिला दोघांसोबत राहायचं आहे. तिला नवराही हवा होता आणि बॉयफ्रेंडही. आता हे कसं शक्य आहे? तर यासाठी तिने ऑफर दिली. ती 15 दिवस तिच्या पतीसोबत आणि 15 दिवस तिच्या प्रियकरासोबत राहील, असं तिनं सांगितलं. तिचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले पंचायत सदस्य थक्क झाले. एवढंच नाही तर मुलीच्या पतीनेही हात जोडले आणि त्याने तिला बॉयफ्रेंडसोबतच राहायला सांगितलं.
advertisement
जोडीदार विवाहबाह्य संबंधात आहे हे कसं ओळखावं? 
जोडीदार एखाद्याच्या प्रेमात पडलाच असेल किंवा त्याचे विवाह बाह्य संबंध असतील, तर ते ओळखायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर याबद्दल काही मार्ग समोर आले आहेत. काही अनुभवी किंवा एक्पर्ट्स लोकांनी याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
स्वतःकडे अधिक लक्ष देणं
जेव्हा पुरुष किंवा महिला प्रेमात असते किंवा एखाद्या नात्याची सुरुवात असते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःकडे खूप लक्ष देते. त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जर तुमचा नवरा किंवा बायको असं काही असेल तर त्यांच्या आयुष्यात कुणीतरी प्रवेश केल्याचं हे लक्षण असू शकतं.
advertisement
तुमची तुलना करणं
जर तुमचा नवरा तुमची तुलना दुसऱ्या महिलेशी करत असेल किंवा या उलट बायको तसं करु पाहात असेल, तर समजून घ्या की त्याला किंवा तिला आता तुमच्यात उणिवा दिसू लागल्या आहेत. हे देखील एक लक्षण असू शकतं.
advertisement
फोनला चिकटून राहणं
नवरा किंवा बायको बराच वेळ फोनवर असेल तर. तसेच आपला फोन एकटं सोडून कुठे जात नसेल, तर काहीतरी गडबड आहे हे समजून घ्या.
देहबोली बदलते
जर तुमचा जोडीदार विचित्र किंवा वेगळं वागत असेल तर ते कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे होऊ शकते. अशावेळी ऑफिसमध्ये जास्त काम असल्याचा आव लोक आणतात. ते बाहेर जास्त वेळ घालवू लागतात आणि तुमच्यासाठी त्यांना वेळच मिळत नसेल, तर काही गडबड आहे असं समजा.
advertisement
जिव्हाळा नसणं
वैवाहिक नात्यात शारीरिक जवळीक सर्वात महत्त्वाची असते. जर तुमच्या नात्यात तसं होत नसेल, तर सावध राहा. जर तुमच्या जोडीदाराचा स्पर्श आवडत नसेल किंवा तुमच्याबद्दल त्याला काहीही वाटत नसेल, तर ते तुमच्यासाठी एक मोठं लक्षण ठरू शकतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
नवरा हवा आणि बॉयफ्रेंडही! महिलेने दिली अशी ऑफर, सगळे चक्रावले, पतीने तर हातच जोडले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement