मेडिकलला ती गोळी आणायला गेला नवरा, बायकोला न सांगता करायचा विचार केला, मोबाईल पेमेंटने बिघडवला खेळ

Last Updated:

Relationship news : यानंतर नवऱ्याने फार्मसीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने फार्मसीला जबाबदार धरलं आहे. तो म्हणाला, या एका चुकीने दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
बीजिंग : पती-पत्नीची बरीच प्रकरणं, बरेच किस्से तुम्हाला माहिती असतील. असंच एका कपलचं एक प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. नवरा गोळी आणायला मेडिकलच्या दुकानात गेला. तिथं त्याने गोळ्या घेतल्या. पण या गोळ्यांमुळे त्याचं मोठं सीक्रेट त्याच्या बायकोला समजलं. त्यानंतर नवऱ्याने मेडिकल दुकानाविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.
चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील यांगजियांग शहरातील हे प्रकरण. एक व्यक्ती एका फार्मसीमध्ये गेला. तिथं त्याने गोळ्या घेतल्या. त्याचं पेमेंट करण्यासाठी  त्याने खिशातून मोबाईल काढला आणि 15.8 युआन म्हणजेच सुमारे 200 रुपये किमतीच्या गोळ्यांचं बिल तो भरत होता.
advertisement
त्याला वाटलं की तो मोबाईलद्वारे पैसे भरेल आणि कोणालाही कळणार नाही. पण खेळ इथेच संपला. पेमेंट फेल झालं. सिस्टममध्ये एक त्रुटी दिसून आली. तेव्हा फार्मसीच्या लोकांनी त्याच्या मेंबर्स कार्डवर असलेला फोननंबर डायल केला. पण तो नंबर त्या पुरूषाचा नसून त्याच्या पत्नीचा होता. फोन उचलताच पत्नीने विचारलं, कोणती खरेदी? दुकानदाराने स्पष्टपणे सांगितलं, गर्भनिरोधक गोळ्या. हे ऐकताच महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच क्षणी तिच्या पतीचं गुपित उघड झालं. विवाहबाह्य संबंधाचं संपूर्ण सत्य बाहेर आलं.
advertisement
यानंतर नवऱ्याने फार्मसीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने फार्मसीला जबाबदार धरलं आहे. तो म्हणाला, या एका चुकीने दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. पण कायदेतज्ज्ञांचे म्हणणं आहे की सर्वात मोठी चूक त्या पुरुषाची स्वतःची होती. त्याचे लग्न झाल्यावरही प्रेमसंबंध होते. जर फार्मसीने त्याचं गुपित जाणूनबुजून उघड केलं असतं तर प्रकरण न्यायालयात गेलं असतं. पण इथं फोन चुकून लावला गेला. गेला.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मेडिकलला ती गोळी आणायला गेला नवरा, बायकोला न सांगता करायचा विचार केला, मोबाईल पेमेंटने बिघडवला खेळ
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement