दोघींनी एकमेकींच्या गळ्यात घातला हार अन् घेतली शपथ
दोन तरुणी वकील दिवाकर वर्मा यांच्या चेंबरमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी एकमेकींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आम्ही मैत्रिणी आहोत. जवळपास 3 महिन्यांपासून एकत्र राहत आहोत. आम्हाला आयुष्यभर पती-पत्नी म्हणून एकत्र राहायचं आहे. आमचं लग्न लावून द्यावं. त्यांना कायदेशीर लग्न करता येणं शक्य नाहीये. दोन्ही तरुणींनी कलेक्ट्रेट परिसरात असलेल्या शिव मंदिरात एकमेकींना हार घालून लग्न केलं आणि आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली.
advertisement
कोर्टने परवानगी दिली नाहीतरी चालेल...
या संपूर्ण प्रकरणावर लग्न केलेल्या तरुणी सांगतात की, त्यांना पुरुष समाजाचा तिरस्कार आहे. एका तरुणीने सांगितलं की, एका मुस्लिम तरुणाने लग्नाचं वचन देऊन तिला फसवले. आता त्यांना आयुष्य एकत्र घालवायचं आहे. जरी त्यांचे कुटुंबीय किंवा कायदा त्यांना लग्नाची परवानगी देत नसले तरी, त्यांनी मंदिर परिसरात लग्न केले आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांना पाठिंबा देतील तर ठीक, नाहीतर त्या आयुष्यभर एकमेकींच्या आधाराने राहतील असं त्यांचं म्हणणं आहे.
...तरीही आम्ही दोघी आयुष्यभर राहू सोबत
पती आशा म्हणाली, 'आम्ही हे करत आहोत कारण आम्हाला पुरुष जातीवर विश्वास नाही. ज्याने आमच्यासोबत चुकीचं केलं त्याला शिक्षा मिळावी. आम्ही सोबत राहू. आम्ही नोकरी करू. माझ्या घरच्यांचा पाठिंबा नाहीये. त्यांना थोडंफार कळलं आहे. ते म्हणतात की तुला जे योग्य वाटेल ते कर. माझ्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल मी घरच्यांना सांगितलं होतं. आमचं नातं तीन महिन्यांपासूनचं आहे. आम्ही विचार केला की आम्ही सोबत राहू.'
पत्नी ज्योती म्हणाली, 'आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून एकत्र राहत आहोत. आम्ही लग्न केलं आहे. याचं कारण असं की, आम्हाला आता पुरुषांपासून खूप लांब राहायचं आहे. पुरुषांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. मी पत्नी म्हणून राहीन. आम्ही खूप आनंदी आहोत. भविष्यातही आनंदी राहू. भविष्यातला आमचा प्लॅन हाच आहे की, आम्ही सोबत राहू आणि एकत्र मिळवू. आम्ही आमचं जीवन जगू.'
वकिलांनी लावून दिली लग्न
या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही तरुणींचे वकील दिवाकर वर्मा म्हणतात, 'दोन्ही तरुणी माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी असंही सांगितलं की त्या पुरुषांचा खूप तिरस्कार करतात. पुरुषांनी त्यांना खूप छळले आहे. सुप्रीम कोर्ट लिव्ह-इन रिलेशनशिपला परवानगी देतं, त्यामुळे या दोघींनी कोर्टात असलेल्या मंदिरात रितीरिवाजानुसार लग्न केले आहे.'
हे ही वाचा : 13 वर्षांची मुलगी बनली आई, 18 वर्षांचा पती फरार! त्यांच्या लग्नाचं कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का