सुरुवातीला एसडीएम तिथे आलं. पण मदरसा संचालकाने गेट उघडण्यास नकार दिला. त्यानंत एसडीएमने पयागपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना बोलावलं. मदरशाचा गेट उघडला, एसडीएम आणि पोलिसांनी मदरशात प्रवेश केला. मदरशाची तपासणी केली. बाथरूम उघडलं आणि तिथून एकएक करून मुली बाहेर पडू लागल्या. तब्बल 40 अल्पवयीन मुली त्या मदरशाच्या बाथरूममध्ये होत्या.
advertisement
जेव्हा पोलीस मदरशात पोहोचले तेव्हा मदरसा संचालकाने अल्पवयीन मुलींना बाथरूममध्ये बंद केलं होतं. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलींची सुटका केली आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली. तपासात असं दिसून आलं की विद्यार्थिनी बहराइचमधील विविध जिल्ह्यांतील रहिवासी होत्या. सर्व मुली त्यांच्या घरून मदरशात शिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या.
मदरशाचा गुप्त पद्धतीने सुरू होता. समोर एक दुकान आणि मागे तीन मजली इमारत होती. जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये की मदरसा तिथं चालत आहे. मदरशाची ओळख सर्वांपासून लपवून ठेवण्याची ही एक युक्ती होती. पण स्थानिक प्रशासनाला परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यांनी त्वरित कारवाई केली.
बोंबला! गर्लफ्रेंडला प्रपोज करणं महागात, बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक, पण का?
सध्या मदरशातील मुली त्यांच्या घरी परतल्या आहेत. एसडीएमची टीम आता मदरशाच्या जागेची पाहणी करत आहे जेणेकरून जागा कशी वापरली जात होती आणि भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया रोखता येतील. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल डीएमला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर मदरशांबद्दलची चिंता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षणासाठी योग्य व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
एसडीएमने सांगितलं की मदरसा संचालकाकडे कोणतंही वैध कागदपत्रे नसल्याचं आढळून आले. वैध कागदपत्रांच्या अभावामुळे मदरसा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मदरशांना मोठ्या प्रमाणात बाह्य निधी मिळत असल्याचा संशय असल्याने मदरशाच्या निधीचा स्रोत निश्चित करण्यासाठी देखील चौकशी सुरू आहे.