TRENDING:

बापरे! 425 वर्षांपूर्वीचं ते संकट पुन्हा येतंय? शास्त्रज्ञांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

Last Updated:

Earthquake Tsunami prediction : 425 वर्षांपूर्वीसारख्याच भूगोल बदलू शकणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत जगाला जाणवत आहेत. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की जर ही घटना आता घडली तर मोठ्या प्रमाणात विनाश होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांना असते. असे काही लोक आहेत जे भविष्य पाहत असल्याचा दावा करतात आणि भविष्यवाणी करतात. तर शास्त्रज्ञ घडणाऱ्या घटनांच्या आधारे भविष्याचा अंदाज बांधतात. अशीच नुकतीच घडलेली ही घटना. ज्यानंतर शास्त्रज्ञांनी मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे. 425 वर्षांपूर्वी घडलेली ती भयानक घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली आहे.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
advertisement

अमेरिकेत भूकंपाचे धक्के बसले आहेत. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणनुसार, सोमवारी रात्री उशिरा 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा मुख्य भूकंप झाला, त्यानंतर 12 तासांत तब्बल 12 भूकंपाचे धक्के बसले. त्यापैकी बरेच 2.5 रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षा जास्त होते. या भूकंपांचं केंद्र कॅस्केडिया सबडक्शन झोन होतं.

हे कसं शक्य आहे? हा माणूस मरतच नाही, पुन्हा पुन्हा जिवंत होतो, 6 वेळा दफनभूमीतून परत आला

advertisement

कॅस्केडिया झोन हा उत्तर व्हँकुव्हर बेटापासून उत्तर कॅलिफोर्नियापर्यंत पसरलेला आहे आणि तो पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली भूकंपीय झोन मानला जातो. सतराव्या शतकात इथं सुमारे 9 रिश्टर स्केल तीव्रतेचा एक मोठा भूकंप झाला, ज्यामुळे किनारपट्टी समुद्रसपाटीपासून काही फूट खाली गेली आणि त्सुनामी आली.

425 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना. ज्यामुळे संपूर्ण भूगोल बदलून गेला होता. ओरेगॉन किनाऱ्यालगतच्या परिसरात अलीकडेच झालेल्या अनेक भूकंपांमुळे शास्त्रज्ञ आणि नागरिकांमध्ये त्याच मोठ्या भूकंपाच्या आणि धोक्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत, ज्यामुळे ओरेगॉनचा नकाशा बदलला. आता पुन्हा 425 वर्षांपूर्वीसारख्याच भूगोल बदलू शकणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत जगाला जाणवत आहेत. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की जर ही घटना आता घडली तर 100 फूट उंचीची त्सुनामी निर्माण होईल आणि किनारी भागात मोठ्या प्रमाणात विनाश होईल.

advertisement

General Knowledge : आहे वेगळा देश तरी श्रीलंका भारताच्या नकाशात का असतो?

फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी म्हणजेच फेमाचा अंदाज आहे की अशा भूकंप आणि वादळामुळे किमान 5800 लोकांचा मृत्यू आणि 100000 लोक जखमी होऊ शकतात. केवळ त्सुनामीमुळे 8000 लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि सुमारे 134 अब्ज डॉलर्सचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. एका अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की जर समुद्राच्या पृष्ठभागाची धूप झाली आणि समुद्राची पातळी वाढली तर किनारी भाग मोठ्या प्रमाणात पाण्याखाली जाऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
बापरे! 425 वर्षांपूर्वीचं ते संकट पुन्हा येतंय? शास्त्रज्ञांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल