त्या घटनेनंतर तो व्यक्ती आपलं 'सामान्य' आयुष्य जगत राहिला. लग्न झालं, दोन मुलं झाली, व्यवसाय सुरू केला आणि लोकांसमोर एका 'सुशिक्षित' 'कुटुंबवत्सल' व्यक्तीचं रूप मिरवत राहिला. पण नियती काही विसरत नाही.
सध्या ती व्यक्ती एका कर्करोग हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की त्याचा कॅन्सर खूपच प्रगत टप्प्यावर आहे आणि त्याला फार काळ शिल्लक राहिलेला नाही. आता ती व्यक्ती रोज आपल्या भूतकाळाकडे पाहतो, रडतो आणि म्हणतो “मी खूप मोठं पाप केलं… आता त्याचीच शिक्षा भोगतोय.”
advertisement
आश्चर्य म्हणजे, त्याच्या कुटुंबालाही त्याच्या या जुन्या कृत्याची कल्पना नव्हती. जेव्हा हे सत्य समोर आलं, तेव्हा घरचेही हादरले.
लेन नावाचा हा व्यक्ती, दोन मुलांचा बाप. त्यांचं आयुष्य अगदी सामान्य होतं. पण काही महिन्यांपूर्वी त्यांच्या गळ्याला सतत वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, पण परिस्थिती गंभीर झाली तेव्हा स्कॅनिंग आणि बायोप्सी केली गेली. अभ्यासातून समजले की त्यांना "ह्यूमन पेपिलोमा व्हायरस" (HPV) मुळे गळ्याचा कॅन्सर झालेला आहे.
HPV हा एक अतिशय सामान्य विषाणू आहे, जो त्वचेच्या अथवा लैंगिक संपर्कामुळे पसरतो. सामान्यतः तो हानिकारक नसतो, पण त्याचे काही स्ट्रेन्स पुढे जाऊन गळा, तोंड, गर्भाशय, गुदद्वार किंवा पुरुषांचे जननेंद्रिय यांचे कॅन्सर होण्याचे कारण ठरू शकतात.
लेन यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. तो 20 वर्षांचा असताना त्याने एका लहान मुलीवर अत्याच्यार केले, तिच्याशी ओरल सेक्स केला होता. त्यावेळी त्याने हा विचार देखील केला नव्हता की त्याचे असे परिणाम त्याला भविष्यात पाहायला मिळतील. पण चार दशके उलटून गेल्यावर याचे परिणाम त्यांनी आपल्या शरीरावर जाणवले.
डॉक्टरांनी जेव्हा त्यांच्या गळ्याची बायोप्सी केली, तेव्हा त्यामध्ये HPV विषाणूचा एक विशिष्ट स्ट्रेन सापडला. याचं मूळ लेन यांच्या त्या जुन्या लैंगिक संपर्काशी जोडले गेले.
ही घटना आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे. अनेकदा आपण तरुणपणात जे काही करतो, त्याचे परिणाम लगेच समोर येत नाहीत. पण शरीरात ते खोलवर घर करून बसतात. HPVसारखे विषाणू दीर्घ काळ झोपलेल्या स्थितीत राहू शकतात आणि नंतर अचानक शरीरात धुमाकूळ घालतात.