एका माणसाची करुणा आणि वाचलं बाळ
कचरापेटीत टाकल्यानंतर सुमारे 10 तासांनी, एका वाटसरूला रडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्याने मुलाला वाचवले. मुलाला तात्काळ रेनाऊन रिजनल मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. वॉशो काउंटी शेरीफ कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, त्याची प्रकृती आता स्थिर आहे. वॉशो काउंटी शेरीफ डॅरिन बालम यांनी मुलाला वाचवणाऱ्या व्यक्तीच्या निस्वार्थ कृत्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, "हा मुलगा आज जिवंत आहे, कारण एका व्यक्तीने मदत करण्यास अजिबात संकोच केला नाही." शेरीफ बालम यांनी समाजाला आठवण करून दिली की, संकटात असलेल्या कोणासाठीही सुरक्षित आणि कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत आणि कोणत्याही मुलाला कधीही धोक्यात सोडू नये.
advertisement
आईवर खुनाचा प्रयत्न करण्यासह अनेक आरोप
सिएरा डिकिन्सन आधीच विवाहित असून ती इतर दोन मुलांची आई आहे. तिला रविवारी अटक करण्यात आली. तिच्यावर खुनाचा प्रयत्न, बाल शोषण आणि दुर्लक्ष किंवा धोका निर्माण करणे यासह अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. तिला 10 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 8.5 कोटी रुपये रोख जमा केल्यानंतरच जामीन मिळेल. जामीन सुनावणीदरम्यान, वॉशो काउंटी शेरीफ डिटेक्टिव्ह क्लेअर हूप्स-ऍडम्स यांनी सांगितले की, डिकिन्सनने दावा केला की, तिला मुलाचे लिंग किंवा त्याची स्थिती याबद्दल काहीही माहिती नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार, बाळ पूर्णपणे टॉवेलमध्ये गुंडाळले होते आणि कचरा पिशवीत टाकले. कारण घाबरल्यामुळे तिला हाच सर्वोत्तम पर्याय वाटला.
अनैच्छिक गर्भधारणा आणि आर्थिक अडचणींचा दावा
डिटेक्टिव्ह हूप्स-ऍडम्सने असेही सांगितले की, डिकिन्सनने दावा केला की तिला 5 जुलै रोजी जन्म देताना ती घाबरलेली होती. तिला आणखी मुले नको होती, कारण तिचे कुटुंब आर्थिक अडचणीत होते. त्यांनी असेही सांगितले की, डिकिन्सनने यापूर्वी 2023 मध्ये गर्भपात केला होता आणि तिने त्यावेळीही गर्भाला कचऱ्यात सोडल्याची कबुली दिली होती. आता पोलीस सामान्य जनतेला नेवाडाच्या 'सेफ हेवन लॉ' बद्दल आठवण करून देत आहेत. हा कायदा पालकांना 30 दिवसांपर्यंतच्या नवजात बाळांना कोणत्याही रुग्णालय, अग्निशमन दल किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीकडे कायदेशीर आणि सुरक्षितपणे सोपवण्याची परवानगी देतो. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला मूल नको असेल, तर तुम्ही त्यांना या ठिकाणी सोपवू शकता, तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
हे ही वाचा : कोणत्या वयानंतर कमजोर होऊ लागते माणसाची स्मरणशक्ती? तुम्हाला माहितीय का यामागचं कारण?
हे ही वाचा : अबब! 1 नव्हे, 2 नव्हे, तर तब्बल 12 दिवसांचा होता ट्रॅफिक जॅम, किती किलोमीटर होती गाड्यांची रांग?