TRENDING:

Ahmedabad plane crash: सीट नं. 11 A; अहमदाबाद विमान अपघाताशी भयावह कनेक्शन, 27 वर्षापूर्वीही घडलेलं थरारक

Last Updated:

Ahmedabad plane crash: अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. 11 A सीट नंबरवरील हा व्यक्ती वाचला असून अशीच आणखी एक घटना याआधीही घडली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. यामध्ये 250 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. मात्र या भयानक प्लेन क्रॅशमध्ये एका व्यक्ती वाचला. 11 A सीट नंबरवरील हा व्यक्ती वाचला असून अशीच आणखी एक घटना याआधीही घडली होती. याच सीट नंबरवरील एका व्यक्तीचा जीव वाचला होता. या वाचलेल्या व्यक्तीने आता त्याची हृदयद्रावक घटना शेअर केलीय.
अहमदाबाद विमान अपघात
अहमदाबाद विमान अपघात
advertisement

थायलंडमधील प्रसिद्ध गायक रुआंगसाक लोयचुसाकने आपल्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. या घटनेचाही 11 A सीट नंबरशी कनेक्शन आहे. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हे प्रकरण नेमकं काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

583 जणांचा मृत्यू! इतिहासातील सर्वात भयानक विमान अपघात, पायलटचे 'शेवटचे शब्द' तुम्हाला रडवतील

काय आहे प्रकरण?

advertisement

1998 मध्ये झालेल्या एका भयानक विमान दुर्घटनेतून गायक रुआंगसाक लोयचुसाक वाचला होता. यावेळी अपघातात 101 लोकांचा मृत्यू झाला होता. लोयचुसाकने सांगितले की, ते ज्या सीट नंबर 11A वर बसले होते, त्याच सीट नंबरवर अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानातील एकमेव वाचलेला प्रवासी विश्वकुमार बसलेला होता.

7 वर्षीय रुआंगसाक लोयचुसाकने म्हटलं, "भारतात झालेल्या विमान अपघातातून वाचलेला एकमेव व्यक्ती माझ्यासारख्याच सीट नंबर 11A वर बसला होता. या दुर्घटनेत प्रियजन गमावलेल्या सर्वांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो." लोयचुसाक हे थाई एअरवेजच्या फ्लाइट TG261 मधून बँकॉकहून सुरत थानीला जात असताना हे विमान लँडिंगच्या प्रयत्नात थांबले आणि दलदलीत कोसळले. या दुर्घटनेत 132 प्रवाशांपैकी 101 जणांचा आणि 14 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता, तर 45 जण जखमी झाले होते.

advertisement

दरम्यान, अशा दुःखद आणि योगायोगाने जुळलेल्या घटनांबद्दल ऐकल्यानंतर, लोकांच्या अंगावर काटाच येत आहे. सोशल मीडियावर हा योगायोगाची चर्चा होत आहे.

मराठी बातम्या/Viral/
Ahmedabad plane crash: सीट नं. 11 A; अहमदाबाद विमान अपघाताशी भयावह कनेक्शन, 27 वर्षापूर्वीही घडलेलं थरारक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल