TRENDING:

अनुकंपावर नोकरी मिळवण्यासाठी आधी बनला 'शोलेचा वीरू', आता घेतली भू-अर्ध समाधी, तरुणाची एकच चर्चा

Last Updated:

आधी त्याला पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरवण्यासाठी त्याच्या नोकरीची फाईल पुढे पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याने सांगितले की, त्याची आई आजारी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनीष पुरी, प्रतिनिधी
अर्ध समाधी घेतलेला तरुण
अर्ध समाधी घेतलेला तरुण
advertisement

भरतपुर : अनुकंपावर नोकरी मिळावी, या मागणीसाठी सध्या एक तरुण चांगलाच चर्चेत आहे. या तरुणाने जे केले, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य झाले आहे. या तरुणाने थेट मुख्यमंत्री जनसुनावणी केंद्राबाहेरच भू अर्ध समाधी घेतली. गौरव उर्फ राधेश्याम फौजदार असे या तरुणानचे नाव आहे.

राजस्थानच्या भरतपूरमधील या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे. याच्या आधीही तो नोकरीच्या मागणीसाठी तीन वेळा पाण्याच्या टाकीवर चढला होता. मात्र, त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला समजावून खाली उतरवले. पण यावेळी त्याने कमालच केली. नोकरीच्या मागणीसाठी त्याने भू-अर्ध समाधी घेतली.

advertisement

आधी त्याला पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरवण्यासाठी त्याच्या नोकरीची फाईल पुढे पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याने सांगितले की, त्याची आई आजारी आहे. उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्याने या सर्व प्रकाराला कंटाळून अर्ध भू समाधीचा निर्णय घेतला. तो आपल्या वडिलाच्या जागेवर अनुकंपामध्ये नोकरीची मागणी करत आहे, असे त्याने सांगितले.

फक्त आठवी पास व्यक्तीने करुन दाखवलं, नोकरी न करता आज वर्षाला कमावतोय कोट्यवधी रुपये, प्रेरणादायी गोष्ट!

advertisement

प्रशासनाने नेमकं काय म्हटलं -

नियमांनुसार हा तरुण अनुकंपाच्या माध्यमातून नियुक्तीसाठी पात्र नाही. कारण त्याच्या वडिलांचे ते आजारी असताना निधन झाले होते. तसेच हा तरुण डींग जिल्ह्यातील रहिवासी असल्याने त्याची फाईल डींग जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. राधेश्यामचे वडील सीआरपीएफच्या अकराव्या बटालियनमध्ये तैनात आहेत. फील्ड ऑपरेशन दरम्यान, नीमच येथून रांची जाताना मेंदूज्वर या आजाराने 1999 मध्ये त्यांचे निधन झाले होते. यानंतर 2019 मध्ये हा तरुण मोठा झाल्यावर त्याने सीआरपीएफमध्ये अनुकंपाच्या आधारावर नोकरीसाठी अर्ज केला. तिथे त्याला मेडिकल टेस्टमध्ये अनफिट करण्यात आले.

advertisement

नोकरी वाल्यांपेक्षा जास्त पैसे कमवायचे आहेत, तर मग आताच करा हे काम, सर्वांना कराल चकित!

तरुणाचं नेमकं काय म्हणणं -

दरम्यान, या तरुणाने असे म्हटले आहे की, सीआरपीएफने राज्य सरकारला एक पत्र लिहून एलडीसीच्या नोकरीची सिफारीश केली. तसेच मागील 4 वर्षांपासून त्याने विभाग, तसेच आमदार, खासदार यांच्या भेटी घेतल्या. मात्र, तरीही त्याला नोकरी मिळाली नाही. मात्र, आता या राधेश्याम नावाच्या तरुणाला आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याचे दिसत असल्याने त्याने जमिनीत अर्ध समाधी घेतली.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
अनुकंपावर नोकरी मिळवण्यासाठी आधी बनला 'शोलेचा वीरू', आता घेतली भू-अर्ध समाधी, तरुणाची एकच चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल