TRENDING:

'तो माझे घातलेले अंडरविअर मागतो', महिला कर्मचाऱ्याचा बॉसवर आरोप, पण तो त्याचं करतो काय?

Last Updated:

Boss deman woman employee used underwear : महिलेने सांगितलं की, माझा बॉस मला दररोज ऑफिसमध्ये माझी एक अंडरविअर आणायला सांगतो. मी आदल्या दिवशी घातलेली पँट किंव शॉर्टस ऑफिसला जाताना सोबत घेऊन जाते आणि ऑफिसमध्ये पोहोचताच मी माझ्या बॅगेतून काढून बॉसला देते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : ऑफिसमध्ये बॉसच्या कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच अपेक्षा असतात. कितीही काम करा बॉस कधीच समाधानी किंवा खूश होत नाही. त्याच्या अपेक्षा अधिकच वाढत जातात. याशिवाय काही ऑफिसमध्ये तुम्ही बॉसचं कर्मचाऱ्यासोबत असलेल्या अफेअर्सबाबतही ऐकलं असेल. पण एका महिला जिने तिच्या बॉसबाबत असं काही सांगितलं आहे, की प्रत्येकाला धक्का बसला आहे.
News18
News18
advertisement

एका महिलेने तिच्या ऑफिस कल्चर आणि बॉसबद्दल असा खुलासा केला आहे, जो इतका विचित्र आहे की कुणी स्वप्नातही त्याबाबत विचार केला नसेल. डेली स्टारचं रिडर्स इंटरॅक्शन सेक्शन जस्ट जेनमध्ये महिलेने तिची समस्या सांगितली आहे आणि त्यावर उपाय मागितला आहे. महिलेने अशी समस्या शेअर केली की कुणालाही धक्का बसेल.

अडीच वर्षे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होतं कपल, प्रत्येक वेळी अपयश, कारण असं डॉक्टरही शॉक

advertisement

महिलेने सांगितल्यानुसार तिची इच्छा नसूनही ती बॉससोबत अफेअर्समध्ये अडकली. तिचा बॉस तिला अनेक प्रकारे आमिष दाखवून तिचा फायदा घेत राहिला. त्या सर्व गोष्टी महिला स्वतःच्या इच्छेने करते पण कधी कधी तिच्या बॉसच्या मागण्या इतक्या विचित्र असतात की त्या पूर्ण करणं तिला कठीण जातं.

महिलेने सांगितलं की, माझा बॉस मला दररोज ऑफिसमध्ये माझी एक अंडरविअर आणायला सांगतो. मी आदल्या दिवशी घातलेली पँट किंव शॉर्टस ऑफिसला जाताना सोबत घेऊन जाते आणि ऑफिसमध्ये पोहोचताच मी माझ्या बॅगेतून काढून बॉसला देते. ते कोणत्या रंगाचं आहे किंवा कोणत्या कापडाचं आहे याच्याशी बॉसला काही देणंघेण नसतं.

advertisement

लेकाचा मृतदेह खांद्यावरच आणि वडिलांनाही मृत्यूने गाठलं, अंत्यसंस्काराआधी भयानक घडलं

आता महिलेचा बॉस तिचे घातलेले अंडरविअर घेऊन करतो काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. महिलेने सांगितलं, 'मी त्याला माझे अंडरवेअर देताच तो ते घालतो. ते त्याच्या शरीरावर कितीही घट्ट असले तरी. माझा बॉस म्हणतो की असं केल्याने त्याला एक वेगळ्याच शक्तीची भावना येते आणि कंटाळवाण्या बोर्ड मीटिंगमध्ये तो कंटाळा करत नाही'

advertisement

'माझा बॉयफ्रेंड आहे. तरीही मी या बॉससोबत प्रेमसंबंधात अडकले. जो इतक्या विचित्र पद्धतीने वागतो. मला माहित आहे की या सर्व गोष्टींमध्ये माझी स्वतःची इच्छा आहे, पण मी त्याच्या बोलण्यात अडकले आणि आता तो मला जे काही करायला सांगेल ते मला करावंच लागेल. माझा बॉस घटस्फोटित आहे आणि तो मला त्याच्यासोबत भाड्याच्या घरात ठेवू इच्छितो. पण आता मला या रिलेशनशिपमधून बाहेर पडायचं आहे', असं म्हणत तिने यावर मार्ग मागितला आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
'तो माझे घातलेले अंडरविअर मागतो', महिला कर्मचाऱ्याचा बॉसवर आरोप, पण तो त्याचं करतो काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल