सेल्स इंजिनअर्सच्या टीममध्ये सामील होण्यासाठी लोकांच्या मुलाखती घेत असताना मोठे अधिकारी ही विचित्र पद्धत वापरतात. या वापरकर्त्याने Reddit वर सांगितलं की त्याने अलीकडेच एका कंपनीची मुलाखत दिली होती. ज्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्याला विक्री अभियंत्यांची मुलाखत घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितलं. ते नेहमीप्रमाणे मुलाखत घेत असत मात्र संध्याकाळी ते सर्वजण दारू पिण्यासाठी बाहेर पडायचे आणि मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना भरपूर दारू पाजण्याचा प्रयत्न करायचे.
advertisement
त्याने पुढे स्पष्ट केलं, की त्याचा उद्देश मनोरंजन हा आहे, असं सांगितलं जातं. मात्र , यासोबतच एखादी व्यक्ती आपल्या मर्यादा कशा सांभाळते आणि नम्रपणे नकार देऊ शकते का? किंवा समोर भरपूर दारू असतानाही दारू पिणे थांबवू शकते का याचीही चाचणी होती. कारण, मद्यपान हा विक्री व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग आहे..
ही पद्धत वापरकर्त्यासाठी खूपच आश्चर्यकारक होती. यावर त्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एका व्यक्तीने कमेंट केली की, हे जाणून घेण्यासाठी ही पद्धत चांगली आहे, की तुम्ही कितीही चांगला वेळ घालवत असला तरी तुमची मर्यादा कशी लक्षात ठेवता. एका युजरने असंही म्हटलं आहे, की दारू पिऊन कधी कधी सभ्य राहणं कठीण होतं. आणखी एका व्यक्तीने म्हटलं, की त्याच्यासाठी ही एक सोपी परीक्षा असेल. त्याला बिअरची चव आवडत नाही. तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं, की उद्योग आणि देश यावर अवलंबून, मद्य हा नक्कीच विक्रीचा मोठा भाग आहे.