व्हिडीओसाठी एक तरुण रेल्वे ट्रॅकवर उतरला होता. व्हिडीओच्या नादात त्यानं आपला जीवही धोक्यात घातला. मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवण्यात तरुण इतका गुंग झाला की, ट्रेन त्याला धडक देऊन गेली. हे थरारक दृश्य त्याच्या व्हिडीओमध्ये कैद झालं.
VIDEO : भावाला वाचवण्यासाठी बहिणीनं लावली जीवाची बाजी, मृत्यूच्या दाढेतून वाचवलं
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण ट्रेनसमोर उभा राहिला आणि व्हिडिओमध्ये ट्रेन दाखवत होता. व्हिडीओमध्ये तरुण ट्रॅकच्या अगदी शेजारी उभा असल्याचं दिसत आहे. वेगानं ट्रेन येते आणि तरुणाला धडक देऊन निघून जाते. तो बनवत असलेल्या व्हिडीओमध्ये हे दृळ्य कैद झालं असून अंगावर काटा आणणारं थरारक दृश्य आहे.
advertisement
टक्कर इतकी जोरदार होती की त्या तरुणाच्या हातातून मोबाईल निसटला आणि तो स्वतः जखमी होऊन जमिनीवर पडला. आता एवढ्या धडकेत त्याच्या वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे स्पष्ट झालं नाही. @idiotsInCamera नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 17 सेंकदाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून लोक अशा स्टंटबाजीवर संताप व्यक्त करत आहेत. लोकांना आपण काय करतोय याचंही भान नसतं.
