खरंतर या व्हिडीओत एक म्हैस आहे, जी न कळत आपलं जेवण समजून साप खाण्याचा प्रयत्न करते. हे दृष्य पाहाताच तुम्हाला नक्कीच त्या म्हैशीची काळजी वाटेल. एकतर म्हैशीने सापाला खाल्लं तर सापासह म्हैशीचाही मृत्यू होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे सापाने जर धोका जाणवून म्हैशीला दंश केला तरी म्हशीचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे हे दृष्य हृदयाचा ठोका चुकवणारे आहेत.
advertisement
या व्हिडीओमध्ये एक म्हैस दिसत आहेत, तिला एका झाडाला बांधलं आहे. तेव्हा त्या झाडावर एक साप येतो. तेव्हा म्हैस एखादी खाण्याची गोष्ट समजून आपल्या जिभेनं त्याला खाण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओत तरी साप खाल्ला असल्याचं दिसत नाही, हा व्हिडीओ इथेच थांबतो, त्यामुळे पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही.
हा व्हिडीओ ‘mjunaid8335’ नावाच्या इंस्टाग्राम युजरने पोस्ट केला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. पण तो व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेलं नाही.
या व्हिडीओवर युजर्स प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हणतं "हे काय बघायला लागलं", तर कुणी म्हणतं, "व्हिडीओ काढत बसण्यापेक्षा त्यांना लांब करायला पाहिजे होतं" तर काहींना हा प्रकार खूपच धक्कादायक वाटला.