TRENDING:

झूमध्ये गेलेला चिमुकला, गोरिल्लाला पाहता पाहता त्याच्या कुशीत पडला; पुढे जे घडलं ते...

Last Updated:

चिमुकला गोरिल्लासमोर पडला आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : तुम्ही कधी ना कधी झूमध्ये गेला असाल. तसे हे प्राणी एका विशिष्ट क्षेत्रात, कुंपणात, पिंजऱ्यात किंवा काचेत बंदिस्त असतात. ते अगदी जवळ आले तर उत्साह वाटतोच पण धडकीही भरते. विचार करा खरंच तुम्ही त्या प्राण्यांसमोर पडलात किंवा ते बाहेर आले तर काय होईल, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एक चिमुकला एका गोरिल्लाच्या कुशीत पडला आहे.
फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब
फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब
advertisement

प्राणीसंग्रहालयात प्राण्यांसोबत मस्करी करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कुणी सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकला, कुणी सिंहासमोर उडी मारली, कुणी हत्तीची शेपटी खेचली, कुणी मगरीच्या जबड्यात हात दिला, मगरीवरून हात फिरवला, असे एक ना दोन किती तरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. त्यानंतर प्राण्यांशी पंगा घेणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल हे तुम्ही पाहिलंच असेल. एक चिमुकला ज्याने प्राण्यांशी पंगा घेतला नाही पण बिच्चारा तो त्या प्राण्यासमोर पडला. हा प्राणीही साधासुधा नाही तर गोरिल्ला.

advertisement

भंडाऱ्यातील शेतकऱ्याने शेताची राखण करायला पाळले 2 कुत्रे पण...; ते दृश्य पाहून अख्खं गाव हादरलं

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक गोरिल्ला एका ठिकाणी बसलेला दिसतो आहे. त्याच्यासमोर एक मुलगा पडला आहे. आता इथं कोणताही प्राणी असता तर त्याने काय केलं असतं, साहजिकच हल्ला. आता या मुलाचं काही खरं नाही, असंच तुम्हालाही वाटत असेल. पण इथं मात्र वेगळंच घडलं. असं काहीतरी की कुणी विचारही केला नसेल.

advertisement

@sachkadwahai इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ 31 ऑगस्ट 1986 चा आहे. मुलाचं नाव लेव्हन मेरिट असं आहे, त्यावेळी त्याचं वय पाच वर्षे होतं. आपल्या कुटुंबासोबत तो जर्सी प्राणीसंग्रहालयात आला होता. तो गोरिल्लाच्या क्षेत्रात पडला. तेव्हा गोरिल्लाने त्याच्यावर हल्ला करण्याऐवजी त्याचं रक्षण केलं. तुम्ही पाहाल तर गोरिल्ला त्या मुलासमोर उभा आहे. काही गोरिल्ला त्याच्या मागे फिरत आहेत.  इतर गोरिल्लांनी त्याच्यावर हल्ला करू नये म्हणून तो मध्ये संरक्षक भिंत बनून राहिला. कुणालाही त्याला इजा करू दिली नाही.  काही वेळाने गोरिल्ला त्या मुलाच्या पाठीवर मायेने हात फिरवताना दिसतो.

advertisement

मालकाला पाहताच बेशुद्ध झाल्या शेळ्या, पण का? पाहा हा VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला एका हॉलिवूड फिल्मची नक्कीच आठवण झाली असेल, ज्यात एक गोरिल्ला एका बाळाचं पिंजऱ्यात रक्षण करतो. व्हिडीओ अनेकांच्या हृदयाला भिडला आहे. देवाने बनवलेला सर्वोत्तम प्राणी, प्राण्यांनाही हृदय असतं, किंग काँग हे रिअल आहे, अशा कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.

advertisement

तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
झूमध्ये गेलेला चिमुकला, गोरिल्लाला पाहता पाहता त्याच्या कुशीत पडला; पुढे जे घडलं ते...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल