भंडाऱ्यातील शेतकऱ्याने शेताची राखण करायला पाळले 2 कुत्रे पण...; ते दृश्य पाहून अख्खं गाव हादरलं

Last Updated:

शेताची राखण करण्यासाठी पाळलेल्या कुत्र्यांनी जे केलं ते धक्कादायक आहे.

शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यांनी जे केलं ते धक्कादायक.
शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यांनी जे केलं ते धक्कादायक.
नेहाल भुरे/भंडारा : हल्ली बरेच लोक श्वान पाळतात. कुणी हौस म्हणून, कुणी प्रेम म्हणून तर कुणी राखण करण्यासाठी. भंडाऱ्यातील असाच एक शेतकरी ज्याने आपल्या शेताची राखण करण्यासाठी एक नाही दोन कुत्रे पाळले. पण शेताची राखण करण्यासाठी पाळलेल्या या कुत्र्यांनी मालकासोबत जे केलं ते पाहून संपूर्ण गाव हादरलं.
तुमसर तालुक्यातील कर्कापूरमधील ही धक्कादायक घटना आहे. विलास पडोळे असं शेतकऱ्याचं नाव आहे. विलासने आपल्या शेतीची राखण करण्यासाठी दोन कुत्रे पाळले. रॉट व्हिलर ब्रीडचे हे कुत्रे. पण त्याचे हे कुत्रे त्याच्याच जीवावर उठले. ज्या कुत्र्यांना त्याने पोसलं त्याच कुत्र्यांनी त्याच्यावरच हल्ला केला. दोन्ही कुत्रे इतके आक्रमक झाले ही दोघंही त्याला फरफटत होते. त्याचे लचके तोडत होते. विलासच्या मदतीसाठी ग्रामस्थ धावून आले. त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत विलास गंभीर जखमी झाला होता.
advertisement
ही घटना 31 डिसेंबरची असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. विलास पडोळेवर सध्या नागपूर इथं उपचार सुरू आहेत. त्यामुळे कुत्रे पाळताना जरा सांभाळून असंच म्हणावं लागेल.
या शेतकऱ्याने जे कुत्रे पाळले ते रॉट व्हिलर कुत्रे जगातील सर्वात खतरनाक कुत्र्यांपैकी एक आहे. ते खूप शक्तिशाली असतात आणि कुणालाही लगेच चावतात. यांचं वजन 35 ते 48 किलो असतं. या पाळण्यास अनेक देशांमध्ये बंदी आहे. पण भारतात बऱ्याच घरांमध्ये हा कुत्रा पाळला जातो.
advertisement
कुत्रा चावल्यावर काय करावं?
ज्या ठिकाणी कुत्रा चावला आहे, ती जागा सतत साबण आणि पाण्याने 10 मिनिटे धुतली पाहिजे. कुत्र्याच्या लाळेतून बाहेर पडणारा लसा विषाणू साबणातील रासायनिक घटकांमुळे नाहीसा होतो. यानंतर, तुम्ही जखमेवर अँटी-बॅक्टेरियल किंवा इतर कोणतीही जखम भरणारी क्रीम लावू शकता. जास्त रक्तस्त्राव होत असल्यास किंवा जखम जास्त असल्यास अशा स्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. याशिवाय, रेबीजविरोधी लस (एआरव्ही) 24 तासांच्या आत दिली पाहिजे. जर तुम्हाला रेबीजची लागण झालेल्या कुत्र्याने चावा घेतला असेल, तर विलंब न करता काही तासांतच योग्य उपचार सुरू करावेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भंडाऱ्यातील शेतकऱ्याने शेताची राखण करायला पाळले 2 कुत्रे पण...; ते दृश्य पाहून अख्खं गाव हादरलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement