TRENDING:

3 कोटींच्या घरात राहायला गेलं कपल, 2 दिवसांतच बायकोची भयानक अवस्था, नवरा हादरला

Last Updated:

महिला म्हणते की या संपूर्ण परिस्थितीचा तिच्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला. तिला सतत चिंता आणि नैराश्य येऊ लागलं. वैवाहिक जीवनावरही परिणाम झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन : आपलं स्वतःचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. असंच घराचं स्वप्न पाहणारं एक कपल, त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. . पण काही महिन्यांतच त्या घरात असं काही घडू लागलं की त्यांनी विचारही केला नव्हता. अचानक ती महिला आजारी पडू लागली. त्यांनी यामागील कारण शोधलं असता त्यांना मोठा धक्का बसला.
News18
News18
advertisement

अमेरिकेतील हे प्रकरण आहे. 28 वर्षांची सारा स्मिथ आणि तिचा नवरा कॉलिन यांनी मे 2024 मध्ये ओहोयोमध्ये 4 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 3.3 कोटी रुपयांत एक घर खरेदी केलं. आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांना होतं. हे घर त्यांच्यासाठी आजार आणि तणावाचे कारण बनलं. या घरात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच सारा आजारी पडू लागली. तिला सर्दी आणि फ्लूसारखी लक्षणं जाणवू लागली.

advertisement

दोनदा हनीमून, पण नवरा खूश करू शकला नाही, बायकोची कोर्टात धाव, काय लागला निकाल?

सुरुवातीला तिने हा एक सामान्य आजार मानला आणि डॉक्टरांकडून उपचार घेतले. औषधांमुळेही काही काळ आराम मिळाला, पण हळूहळू तिची समस्या वाढत गेली. सहा महिन्यांतच तिला लाल पुरळ उठू लागले आणि डोळ्यांभोवती खाज येऊ लागली. स्थिती इतकी बिकट झाली की त्वचेला भेगा पडू लागल्या आणि रक्तस्त्राव सुरू झाला.

advertisement

साराने सोशल मीडियावर तिची समस्या शेअर केली. तिथे लोकांना लगेच अंदाज आला की हे त्यांच्या नवीन घरात असलेल्या बुरशीमुळे असू शकतं. त्यांच्या सल्ल्यानुसार सारा आणि तिच्या पतीने याची तपासणी केली. यासाठी, त्यांनी एका विशेष प्रशिक्षित 'मोल्ड डॉग'ला बोलावलं. ज्याने घराच्या जवळजवळ प्रत्येक भागात बुरशी आणि पाण्याचं नुकसान आढळून आलं. बहुतेक बुरशी कार्पेट आणि भिंतींमध्ये लपलेली होती. तपासणीनंतर असं आढळून आलं की घराच्या छताचं पाण्याने झालेलं नुकसान पांढऱ्या रंगाने झाकलेलं होतं. म्हणजेच खरी समस्या तिथंच लपलेली होती.

advertisement

सारा म्हणते की या संपूर्ण परिस्थितीचा तिच्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला. तिला सतत चिंता आणि नैराश्य येऊ लागलं. वैवाहिक जीवनावरही परिणाम झाला. तिला तिच्या पतीपासून वेगळे होऊन कधीकधी तिच्या पालकांसोबत तर कधीकधी तिच्या सासरच्या लोकांसोबत राहावं लागतं.

हॉटेलमध्ये रात्र घालवायला गेलं कपल, 2-4 तासांतच बाबूची अशी अवस्था, पळाली जानू

advertisement

ती म्हणते की तिचा पती घराबाहेर राहत असल्याने त्याला कोणतीही समस्या नव्हती, परंतु ती स्वतः घरून काम करते, ज्यामुळे घरी राहणं तिच्यासाठी धोकादायक ठरलं. जेव्हा सारा तिच्या पालकांच्या घरी राहू लागली तेव्हा तिची तब्येत हळूहळू सुधारू लागली. दोन आठवड्यांत तिचे डोळे बरे झाले, परंतु जेव्हा तिला तिच्या घरी परत जावं लागलं आणि वस्तू काढाव्या लागल्या तेव्हा लक्षणं पुन्हा दिसू लागली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर पुन्हा गडगडले, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या आजारामुळे तिच्यावर मोठा आर्थिक भार पडला.  बुरशी काढून टाकण्याचा खर्च सुमारे 10,000 डॉलर्स सुमारे 8.3 लाख रुपये होता, तर विमा कंपनीने यासाठी कोणतीही मदत केली नाही. याशिवाय त्यांना त्यांच्या 90% वस्तू देखील फेकून द्याव्या लागल्या, कारण बुरशी त्यांच्यातही शिरली होती.

मराठी बातम्या/Viral/
3 कोटींच्या घरात राहायला गेलं कपल, 2 दिवसांतच बायकोची भयानक अवस्था, नवरा हादरला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल