गुरुग्राम : ताजमहल हे जगभरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक याठिकाणी भेट देतात. यातच याठिकाणी आलेल्या एका पर्यटक दाम्पत्यासोबत एक धक्कादायक घटना घडली.
एक दाम्पत्य ताजमहाल फिरण्यासाठी आग्रा येथे आले होते. ते आपल्यासोबत आपला पाळीव कुत्राही घेऊन आले होते. जेव्हा ते फतेहपूर सीकरी स्मारक फिरायला गेले त्यांच्यासोबत आलेला त्यांचा कुत्रा हॉटेलमधून गायब झाला आहे. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आपल्या कुत्र्याच्या शोध घेण्यासाठी व्हिडिओ तयार करुन अपलोड केला. हे दाम्पत्य उत्तरप्रदेशचे गुरुग्राम येथील रहिवासी आहे. कुत्रा शोधणाऱ्याला 20 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असेही या दाम्पत्याने सांगितले.
advertisement
कधी घडली घटना -
ग्राच्या ताज व्यू हॉटेलमधून ग्रेहाउंड (Greyhound) नावाचा एक कुत्रा 3 नोव्हेंबरला गायब झाला. त्याच्या मालकाने सोशल मीडिच्या माध्यमातून माहिती दिली की, ग्रेहाउंड सकाळी 9 वाजेच्या पेट माइंडरच्या हातातून पळून गेला होता. सर्वात शेवटी त्याला ताज महल मेट्रो स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सकाली 9.25 ला पाहिले गेले. दुर्दैवाने आपला कुत्रा पळून गेल्याची माहिती त्यांना तीन तासांनंतर मिळाली. त्यावेळी ते फतेहपूर सिक्रीजवळ होते. त्यामुळे त्यांना तेथे पोहोचण्यासाठी सुमारे एक तास अधिक लागला.
कुत्र्याचा शोध सुरू -
ग्रेहाऊंडचा शोध घेण्याच्या आशेने त्याचे मालक ताज व्ह्यू आणि मेट्रो स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात सतत शोध घेत आहेत. शाहजहान पार्क आणि आग्रा गोल्फ कोर्सच्या आसपासच्या भागातही त्यांनी त्याला शोधले. त्यानी आपला कुत्रा सापडल्यास त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहनही सोशल मीडियावर केले आहे.
कुत्रा शोधून दिल्यास बक्षीसही देणार -
जो कुणी व्यक्ती या कुत्र्याबद्दल माहिती देईल, ज्यामुळे त्याला शोधण्यात मदत करेल, त्याला मालकाकडून 20,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
कुत्रा सापडल्यास कुठे संपर्क कराल -
फोन नंबर: +91-7838899124, +91-7838387881, +91-9834078956
सोशल मीडिया:
Facebook (https://www.facebook.com/greenappplemojito),
Instagram (@greenapplemojito),
Twitter (@patrakasturi)
