4 वर्षांचं अफेअर, सातत्याने शारीरिक संबंधही ठेवले, पण लग्नाची वेळ येताच..., तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
couple relationship - एका तरुणाने तब्बल 4 वर्षे तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले आणि लग्नाचे आमिष देत राहिला. मात्र, लग्नाची वेळ येताच त्याने तरुणीसोबत लग्नासाठी वेगळा निर्णय घेतला. शुभम निर्मलकर असे आरोपीचे नाव आहे.
अनुप पासवान, प्रतिनिधी
कोरबा - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. त्यातच लग्नाचे आमिष देऊन फसवणुकीचेही प्रकार समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीची फसवणूक केली आहे. लग्नाचे आमिष देऊन त्याने प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. मातर्, लग्नाची वेळ येताच त्याने नकार दिला.
advertisement
काय आहे संपूर्ण घटना -
एका तरुणाने तब्बल 4 वर्षे तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले आणि लग्नाचे आमिष देत राहिला. मात्र, लग्नाची वेळ येताच त्याने तरुणीला लग्नासाठी नकार दिला. शुभम निर्मलकर असे आरोपीचे नाव आहे. मानिकपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
लग्नाला नकार -
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आणि शुभम या दोघांमध्ये मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचेही वचन दिले. मात्र, जेव्हा लग्नाची वेळ आली, तेव्हा शुभमने लग्नास नकार दिला आणि तरुणीला सोडून दिले. याप्रकरणी तरुणीने मानिकपूर पोलिसात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तरुणीने सांगितले की, मागील 4 वर्षांपासून त्या तरुणाने तिची फसवणूक करत तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. तसेच सातत्याने तिच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले.
advertisement
याप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यूबीएस चव्हाण यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, आरोपीविरोधात कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
view commentsLocation :
Korba,Chhattisgarh
First Published :
November 05, 2024 7:18 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
4 वर्षांचं अफेअर, सातत्याने शारीरिक संबंधही ठेवले, पण लग्नाची वेळ येताच..., तरुणीसोबत नेमकं काय घडलं?


