आदित्य वर्ल्ड सिटी कॉलनीमध्ये राहणारे मनोज उपाध्याय आणि त्यांची पत्नी अंजली शर्मा यांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी मोठ्या बदनामीचे आमिष दाखवून 3.68 लाख रुपयांना गंडा घातला. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना टेलिग्रामवर अर्धवेळ कामाचं आमिष दाखवलं आणि कामाच्या नावाखाली गुंतवणूक करायला लावली. या फसवणुकीनंतर पीडित कपलने वेव्ह सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
advertisement
एसीपी वेव्ह सिटी प्रियश्री पाल म्हणाल्या की, मनोज आणि अंजली पूर्वी नोएडा येथील एका कंपनीत काम करायचे. पण गेल्या महिन्यात त्यांची नोकरी गेली. नोकरी गमावल्यानंतर दोघंही ऑनलाइन अर्धवेळ काम शोधत होते. या काळात ते टेलिग्रामवरील एका ग्रुपशी जोडले गेले. ज्यामध्ये त्यांना मीशो ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली काम पूर्ण करण्याच्या बदल्यात कमिशन देण्याचं आश्वासन देण्यात आलं.
भाड्याचं घर पाहायला जायचे नवरा-बायको, बोलायचे फक्त 4 शब्द, निघून जाताच ढसाढसा रडायचा घरमालक
सुरुवातीला जेव्हा जोडप्याने 100 रुपयांचं काम केले तेव्हा त्यांना 200 रुपये परत मिळाले. नंतर त्यांनी 500 रुपये गुंतवले आणि त्यांना 1000 रुपये मिळाले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते कामासाठी पैसे गुंतवत राहिले. हळूहळू, कामांची संख्या वाढत गेली आणि गुंतवणुकीची रक्कमही वाढत गेली. पण काही काळानंतर, काही कारणांनी पैसे देणं थांबवण्यात आले.
जेव्हा त्यांनी टेलिग्राम ग्रुपवर कस्टमर केअरशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की त्यांना 20 कामं पूर्ण करावी लागतील, त्यानंतरच त्यांना सर्व पैसे परत मिळतील. पण जेव्हा ते सतराव्या कामावर पोहोचले तेव्हा कामं येणं बंद झालं. वारंवार तक्रार करूनही कोणतीही मदत मिळाली नाही. या काळात या जोडप्याने एकूण 3 लाख 68 हजार 100 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले होते.
वयाची पन्नाशी उलटली, पण लग्न झालं नाही, 2 सख्ख्या भावांनी जे केलं ते हादरवणारं
जेव्हा त्यांना शेवटी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा ते वेव्ह सिटी पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 418(4) (गुन्हेगारी विश्वासघात) आणि आयटी कायद्याच्या कलम 66ड (कॉम्प्युटरचा गैरवापर करून फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एसीपी प्रियश्री पाल म्हणाल्या की, तपास सुरू आहे आणि आरोपींची ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी लोकांना अशा ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला.
