वयाची पन्नाशी उलटली, पण लग्न झालं नाही, 2 सख्ख्या भावांनी जे केलं ते हादरवणारं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Unmarried brothers end life : दोघांचंही वय उलटून गेलं पण लग्न झालं नाही. या नैराश्येतून दोन्ही सख्ख्या भावांनी जे केलं, ते धक्कादायक आहे. त्यांनी असं कृत्य केलं जे वाचूनच तुम्ही हादरून जाल.
बंगळुरू : किती तरी लोक आहेत, ज्यांचं लग्न जमत नाही. असेच दोन सख्खे भाऊ, दोघांनी वयाची पन्नाशी ओलांडली. पण त्यांचं लग्न काही जमेना, त्यांना लग्नासाठी मुलगी काही मिळेना. दोघांचंही वय उलटून गेलं पण लग्न झालं नाही. या नैराश्येतून दोन्ही सख्ख्या भावांनी जे केलं, ते धक्कादायक आहे. त्यांनी असं कृत्य केलं जे वाचूनच तुम्ही हादरून जाल. कर्नाटकातील ही धक्कादायक घटना आहे.
हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात राहणारा संतोष रवींद्र गुंडे आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे दोघं सख्खे भाऊ. दोघांचं वय अनक्रमे 55 आणि 50 वर्षे. दोघांच्या वयाची पन्नाशी ओलांडली होती. पण त्यांचं लग्न काही झालं नव्हतं. या नैराश्येत दोघंही होतं, याबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली. वय उलटून गेल्याने लग्न न झाल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या भावांनी विष घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं आहे, असं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.
advertisement
शनिवारी 31 मे रोजी घडलेली ही घटना. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याने नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. दोघंही कुटुंबासोबत राहत होते की एकटे याबाबत तपास सुरू आहे.
advertisement
होणाऱ्या नवऱ्यानं लग्न मोडलं, तरुणीचं टोकाचं पाऊल
याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातही लग्नाच्या कारणाने एका 22 तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्न जमल्यानंतर काही महिन्यांनी नवरदेव मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने तरुणीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपी महेश याचा विवाह जामखेड तालुक्यातील डिसलेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या सतीश सुरवसे यांच्या मुलीसोबत ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने हे लग्न जमलं होतं.
advertisement
पण लग्न जमल्यानंतर मुलगा महेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीचा छळ करायला सुरू केला. 'तू मला आवडली नाहीस', 'मला तू मॅच होत नाही', 'तू मला शोभून दिसणार नाहीस', असं म्हणत आरोपीनं अनेकदा पीडित तरुणीचा अवमान केला. आरोपीचे आई वडील देखील मुलीच्या घरच्यांना 'तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभून दिसत नाही' असं म्हणत होते.
advertisement
नवरदेव मुलाकडील कुटुंबीयांच्या या छळामुळे गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलगी मानसिक तणावात होती. पुढे नवरदेव मुलाच्या घरच्यांनी जमलेलं लग्न मोडलं. या प्रकारामुळे गुरुवारी पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी मुलीचे वडील सतीश सुरवसे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मानसिक छळासह विविध कलमांतर्गत नवरदेव मुलगा आणि त्याचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे आणि आई अनुजा यांच्यावर देखील पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Karnataka
First Published :
June 01, 2025 2:47 PM IST