'भिकारी'च्या 3-3 बायका, सगळ्यांना ठेवतो खूश, सांभाळतो कशा? पद्धत पाहून पोलीसही अवाक

Last Updated:

Beggar thief 3 wife : 36 वर्षांची व्यक्ती. बाबाजान असं त्याचं नाव. तो भिकाऱ्यासारखा जगत होता. बाबाजानने पोलिसांसमोर केलेला सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे त्याला तीन बायका आहेत. 

News18
News18
बंगळुरू : भारतात एकापेक्षा जास्त पत्नी बेकायदेशीर मानलं जातं. तरी काही पुरुष आहेत, ज्यांच्या एकापेक्षा अधिक पत्नी आहेत. अशीच एक व्यक्ती जिला एक-दोन नाही तर तब्बल तीन-तीन बायका आहेत. याहून तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की ही व्यक्ती भिकारी आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमधील एक असा अनोखा प्रकार उघडकीस आला की पोलीसही आश्चर्यचकित झाले.
बंगळुरूमधील ही 36 वर्षांची व्यक्ती. बाबाजान असं त्याचं नाव. तो भिकाऱ्यासारखा जगत होता. बाबाजानने पोलिसांसमोर केलेला सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे त्याला तीन बायका आहेत.  त्याच्या पत्नी बंगळुरू, चिक्काबल्लापुरा आणि श्रीरंगपट्टनच्या बाहेरील अनेकलजवळील शिकारीपल्या इथं राहतात. त्याने सांगितलं की तो त्याच्या तिन्ही पत्नींच्या संपर्कात आहे. त्याला नऊ मुलंही आहेत. तो सर्वांची काळजी घेतो.
advertisement
पोलिसांनी बाबाजानला चोरी करताना पकडलं. गेल्या आठ वर्षांपासून चोरी करत होता. आरोपीने सांगितले की कुटुंब चालवणे कठीण होतं, म्हणून तो चोरी करू लागला आणि एक व्यावसायिक चोर बनला.
आरोपी त्याच्या 16 वर्षांच्या मुलालाही चोरी करण्यासाठी सोबत घेऊन जात असे. त्यांनी मिळून चोरीच्या अनेक घटना केल्या. खरंतर 7 मे रोजी बेटादासनपुरा परिसरातील 56 वर्षीय रोझमन्ना यांच्या घरात पिता-पुत्र जोडीने चोरी केली होती. रोझमन्ना कपडे लटकवण्यासाठी टेरेसवर गेली होती. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. इतक्यात बाबाजानने आपल्या मुलाला खुणावलं. 20 मिनिटांत ते 4.6 लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेले.
advertisement
चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 13 मे रोजी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिसांनी दोघांनाही पकडलं.  पोलिसांनी आरोपींकडून 188 ग्रॅम सोन्याचे दागिने, 550 ग्रॅम चांदी आणि 1500 रुपये रोख जप्त केले.
advertisement
पोलीस अधिकारी नवीन जीएम म्हणाले, 'बाबाजान अशा रिकाम्या घरांची रेकी करत असे. ज्या घरांचे दरवाजे उघडे होते किंवा जिथं महिला गच्चीवर जास्त असत, अशा घरांना तो लक्ष्य करायचा. आरोपीला वाटलं की त्याच्या मुलाचं वय कमी असल्याने त्याला शिक्षा होणार नाही. त्याला तुरुंगात पाठवलं जाणार नाही.'
मराठी बातम्या/Viral/
'भिकारी'च्या 3-3 बायका, सगळ्यांना ठेवतो खूश, सांभाळतो कशा? पद्धत पाहून पोलीसही अवाक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement