भाड्याचं घर पाहायला जायचे नवरा-बायको, बोलायचे फक्त 4 शब्द, निघून जाताच ढसाढसा रडायचा घरमालक

Last Updated:

Husband wife news : पती-पत्नी भाड्याने घर पाहण्यासाठी जायचे. मग घरमालक घरात बोलावताच, ते हसत हसत सांगायचे की आम्हाला एक छान घर हवं आहे. मग काही वेळाने जेव्हा ते घराबाहेर पडायचे तेव्हा मालकाची अवस्था वाईट असायची.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
लखनऊ :  असे कितीतरी लोक आहे, ज्यांचं स्वतःचं घर नाही. ते लोक भाड्याच्या घरात राहतात. भाड्याचं घर म्हटलं की या घरातून त्या घरात फिरणं आलंच. असंच एक कपल जे भाड्याचं घर शोधत होतं. भाड्याचं घर बघायला म्हणून हे कपल जायचं. पण तिथं ते असं काही करायचे की घरमालकाची अवस्था वाईट व्हायची. कपल जाताच घरमालक ढसाढसा रडायचा.
advertisement
उत्तर प्रदेशातील बागपतमधील हे विचित्र प्रकरण आहे. बरौत शहरातील नेहरू रोडवरील राम कॉलनीत घडलेली ही घटना. एक महिला घरात एकटीच राहत होती. शकुंतला जैन असं या महिलेचं नाव.  भाड्याने घर शोधणाऱ्याने कपलने या महिलेचा दरवाजा ठोठावला.
महिलेनं सांगितलं की, ती तिच्या घरात एकटीच राहते. तिचा नवरा जगदीश जैनचं 15 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा प्रवीण दिल्लीत एका खाजगी कंपनीत काम करतो. शुक्रवारी दुपारी ती घरी विश्रांती घेत होती. दरम्यान, एका महिलेने आणि एका पुरूषाने दार ठोठावलं आणि सांगितलं की ते भाड्याने घेतलेलं घर पाहण्यासाठी आले आहेत.
advertisement
शकुंतलाला वाटलं की कदाचित काही गरजू लोक असतील, म्हणून तिनं दार उघडलं. दोघांनीही घराकडे पाहण्याचं नाटक केला आणि मग अचानक शकुंतलावर झडप घातली. त्यांनी शकुंतलाच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि कानातील कानातले हिसकावून घेतले. यानंतर त्यांनी तिला धमकी दिली की जर तिने कोणाला काही सांगितलं किंवा पोलिसात तक्रार केली तर ते तिला मारतील. घाबरलेली शकुंतला कशीतरी बाहेर आली आणि तिने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. कॉलनीतील रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
advertisement
दरोडेखोरांनी एका विधवेच्या घरात घुसून दिवसाढवळ्या दरोडा टाकला. महिला घरात एकटी असताना  आणि महिलेचे दागिने हिसकावून पळून गेले. दरोडेखोर पळून जाताना कॉलनीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.
advertisement
बारोट सर्कल ऑफिसर (सीओ) विजय कुमार यांनी सांगितलं की, पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आलं. पीडितेशी संपर्क साधण्यात आला आहे आणि तक्रार मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली जाईल. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात असून त्यांना लवकरच अटक केली जाईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
भाड्याचं घर पाहायला जायचे नवरा-बायको, बोलायचे फक्त 4 शब्द, निघून जाताच ढसाढसा रडायचा घरमालक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement