बऱ्याचदा जोडपी वर्षानुवर्षे मूल होण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांची गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह येत नाही. यामागे काही वैद्यकीय कारणं आहे. पण प्रत्येक वेळी कारण केवळ वैद्यकीय समस्या असेलच असं नाही. अशीही कारणं असतात ज्याचा आपण कधी विचार केला नसेल. किंबहुना डॉक्टरांनाही आश्चर्यचकित करतात. असंच हे प्रकरण.
Relationship : लग्न झाल्यानंतर बेबी प्लॅनिंग कधी करायचं? योग्य वेळ कोणती?
advertisement
स्त्रीरोग आणि प्रजनन तज्ज्ञ डॉ. आशिता जैन यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि एका केसबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, एक 32 वर्षीय जोडपं त्यांच्याकडे आलं, जे गेल्या अडीच वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होतं. पण प्रत्येक वेळी निकाल नकारात्मक येत असे. तरी आशिता जैन यांनी या कपलकडे ना कोणता रिपोर्ट मागितला, ना त्यांना कोणती टेस्ट करायला सांगितली. बोलण्याबोलण्यातच त्यांना खरं कारण समजलं जे धक्कादायक आहे.
खरं तर आतापर्यंत या कपलमध्ये शारीरिक संबंध आले तेव्हा पतीचं वीर्यस्खलन कधी झालंच नाही. दुसरं म्हणजे पत्नी देखील आरामदायक नव्हती कारण तिला जवळीकतेबद्दल भीती आणि अस्वस्थता वाटत होती. तिने तिच्या मित्रांकडून आणि आजूबाजूच्या लोकांकडून शारीरिक संबंधाच्या स्टोरी ऐकल्या होत्या. ज्या बहुतेक वेदना आणि भीतीशी संबंधित होत्या. त्यामुळे ती घाबरली होती. परिणामी तिचं वैवाहिक जीवन थांबले आणि यामुळेच गर्भधारणा शक्य झाली नाही.
Health Risk Of The Day : चहासोबत बिस्कीट खाल्ल्याने काय होतं?
डॉक्टर शेवटी म्हणतात की जोडप्यांनी अशा मुद्द्यांवर कोणतीही लाज न बाळगता मोकळेपणाने बोललं पाहिजे. सर्वप्रथम समस्या कुठे आहे आणि गर्भधारणेचे नियोजन का केलं जात नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ती वेदनांची भीती आहे, कृती करण्याबाबत चिंता आहे की चुकीच्या माहितीमुळे नकारात्मक परिणाम होत आहे.